सावर्डेत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: July 5, 2015 01:10 IST2015-07-05T01:10:10+5:302015-07-05T01:10:10+5:30

विद्युत मोटारीचा स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का

The death of the young person in the presence of a joint venture | सावर्डेत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

सावर्डेत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

कुंभोज : सावर्डे (ता. हातकणंगले) पैकी प्रतापनगर येथील संतोष संभाजी पाटील (वय ३५) या तरुणाचा भिंतीच्या गिलाव्यास पाणी मारत असताना लहान विद्युत मोटारीचा स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. संतोषच्या आकस्मित निधनाने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष शरद सहकारी साखर कारखान्यात नोकरीस आहे. सध्या त्याच्या राहत्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, सायंकाळी संतोष भिंतीच्या गिलाव्यास लहान विद्युत मोटारीच्या सहाय्याने पाणी मारत असताना विजेचा तीव्र धक्का बसला. यावेळी शेजारी गोठ्यात म्हशीची धार काढत असलेल्या संतोषच्या पत्नीने मेनस्वीच तत्काळ बंद केला. त्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे दोन्हीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
संतोषच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरच्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलीस पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पेठवडगाव येथील सरकारी रुग्णालयात रात्री आठनंतर आणणेत आला. संतोषला बारा वर्षांची मुलगी, तर सहा वर्षांचा मुलगा आहे.
 

Web Title: The death of the young person in the presence of a joint venture