Death of an unconscious drug sales officer | बेशुद्धावस्थेतील वाईच्या औषध विक्री अधिकाऱ्याचा मृत्यु

बेशुद्धावस्थेतील वाईच्या औषध विक्री अधिकाऱ्याचा मृत्यु

ठळक मुद्देबेशुद्धावस्थेतील औषध विक्री अधिकाऱ्याचा मृत्युगडहिंग्लजच्या लॉजमधील घटना

गडहिंग्लज : शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील एका लॉजमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला.विजय वामन जमदाडे (वय ५० रा.वाई, जि.सातारा) असे मृताचे नाव आहे. बुधवारी (७) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना उघडकीस घडली.परंतु,त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.


पोलीसातून मिळालेली माहिती अशी, जमदाडे हे एका औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत विभागीय विक्री अधिकारी म्हणून कार्यरत होते.सोमवारपासून (५)आपल्या दोन सहकाऱ्यांसह ते येथील बसस्थानकाच्या पाठीमागील एका लॉजमध्ये मुक्कामाला होते.

मंगळवारी (६) रात्री जेवण करुन ते लॉजमध्ये झोपले होते. बुधवारी (७)सकाळी उशिरापर्यंत ते उठले नव्हते.त्यांचे सहकारी उठवायला गेले त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.


सायंकाळी उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलीसात या घटनेची नोंद झाली आहे .

Web Title: Death of an unconscious drug sales officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.