शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘अण्णां’च्या निधनाच्या धक्क्याने ‘अण्णाराव’ गेले

By admin | Updated: March 7, 2015 01:03 IST

हत्येचा धक्का सहन न झाल्यामुळे जगाचा निरोप

राम मगदूम / गडहिंग्लज ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यानेही जगाचा निरोप घेतला. आयुष्यभर अण्णांशी आणि लाल बावट्याशी निष्ठा जपलेल्या या कार्यकर्त्याचे नाव आहे कॉ. एम.आर. तथा अण्णाराव मिलके. गडहिंग्लज तालुक्यातील नूल या स्वातंत्र्यसैनिकांच्या क्रांतिकारी खेड्यात त्यांचा जन्म झाला. कोल्हापुरात ते कॉ. एम. आर. मिलके, तर गावाकडे अण्णाराव म्हणूनच परिचित होते. १९६५ च्या सुमारास ते पोटापाण्यासाठी कोल्हापूरला गेले. उद्यमनगरातील किसान ट्रॉली कारखान्यात ४-५ वर्षे वेल्डर म्हणून काम केले. १९७० मध्ये गडमुडशिंगी येथील आर. बी. पाटील सहकारी खरेदी-विक्री संघात फोरमन म्हणून नोकरी मिळाली. त्याठिकाणी कामगारांचे पुढारीपण करत असतानाच त्यांचा पानसरे अण्णांशी संपर्क आला. कामगारांची संघटना बांधली म्हणून संस्थेत त्यांच्यावर चोरीचा देखील आरोप झाला. बिंदू चौक माहीत नसणाऱ्या कामगारांना तो चौक दाखविला म्हणून संस्थाचालकांनी त्यांना त्रास दिला. मात्र, न डगमगता त्यांनी लाल बावटा अभिमानाने खाद्यांवर मिरविला. सेवानिवृत्तीनंतर काही काळ त्यांनी अण्णांच्या गाडीवर चालक म्हणून काम केले. वयोमानामुळे दृष्टी कमी झाल्यामुळे चारचाकीऐवजी अण्णांना ते दुचाकीवरूनच ने-आण करायचे. त्यांचा मुलगा श्रीनिवास याने कम्युनिस्ट पक्षाच्या पणजी ते दिल्ली जनजागरण रॅलीत अण्णांच्या गाडीचे सारथ्य केले. त्यांची स्नुषा वैशाली हिने देखील काही वर्षे अण्णांच्या पक्ष कार्यालयात सेवा केली. अण्णांच्या कुटुंबाशी त्यांचे अत्यंत घरोब्याचे संबंध होते. सहा वर्षांपूर्वीच शेतीच्या ओढीमुळे ते नूलला आले. वडिलार्जित शेतीत त्यांनी फळझाडे लावली. आयुष्याची संध्याकाळ आनंदात घालवत असतानाच वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायू आला. अण्णांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांनी त्यांना समजू दिली नव्हती. मात्र, वृत्तपत्रातील बातमीवरून त्यांना ही क्लेशदायक घटना समजली. त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ‘फोरमन’मुळे ‘मॅनेजर’ला मिळाला न्याय वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्ती असतानादेखील संघाच्या व्यवस्थापनाने फोरमन मिलकेंना ५८ व्या वर्षी सक्तीने निवृत्त केले. अण्णांनी स्वत: मिलकेंचे वकीलपत्र घालून त्यांना न्याय मिळवून दिला. अशाचप्रकारे दडपशाहीने पदमुक्त केलेल्या मॅनेजर पाटलांनाही त्याच निकालाच्या आधारे संस्थेला पुन्हा कामावर घ्यावे लागले. उर्वरित सेवा करून दोघेही सन्मानाने सेवानिवृत्त झाले होते.