कोल्हापूर : पूरग्रस्त कॉलनी, शिंगणापूर येथील दाजीबा शेकबा पाटील (वय ५१) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
(१९०१२०२१-कोल-दाजीबा पाटील निधन)
मीनल भोसले
कोल्हापूर : मंगळवारपेठ, जरग गल्ली येथील मीनल दिलीप भोसले (वय ५५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, दीर, काका, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी आहे. (१९०१२०२१-कोल-मीनल भोसले निधन)
महादेव माळकर
कोल्हापूर : गंगावेश येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महादेव दादोबा माळकर (वय ८६) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (१९०१२०२१-कोल-महादेव माळकर निधन)
प्रेमनाथ हारुगले
कोल्हापूर : साठबारी, बी वॉर्ड, मंगळवारपेठ येथील प्रेमनाथ ऊर्फ बाळू गणपत हारुगले वय (५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. (१९०१२०२१-कोल-प्रेमनाथ हारुगले निधन)
कांचन पाटील
कोल्हापूर : शिंगणापूर येथील कांचन बाबूराव पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी आहे. (१९०१२०२१-कोल-कांचन पाटील निधन)
इंदूबाई साठे
कोल्हापूर : रुई, ता. हातकणंगले येथील इंदूबाई रामचंद्र साठे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी आहे. (१९०१२०२१-कोल-इंदूबाई साठे निधन)
शांताबाई कांबळे
कोल्हापूर : येथील शांताबाई भास्कर कांबळे (वय ८१) यांचे मंगळवारी निधन झाले. सेवानिवृत्त सहायक फौजदार सुनील कांबळे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी पंचगंगा घाट येथे आहे. (१९०१२०२१-कोल-शांताबाई कांबळे निधन)
दीपक मोहिते
कोल्हापूर : सावर्डे, ता. हातकणंगले येथील दीपक मारुती मोहिते (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी आहे. (१९०१२०२१-कोल-दीपक मोहिते निधन)