शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

साखरेची पोती अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: September 10, 2014 00:28 IST

हेमरस साखर कारखाना : एकजण गंभीर

चंदगड : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस कारखान्यात (ओलम अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज) साखरेची पोती ट्रकमध्ये भरत असताना साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर कोसळून शिवाजी गुंडू पाटील (रा. कुदे्रमानी, जि. बेळगाव) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर चाराप्पा कोलारी (रा. चंदकोट, ता. शिंदगी, जि. विजापूर) हा कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाला. काल, सोमवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली.कारखाना गोडावूनमधील साखरेची पोती ट्रकमध्ये भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार व चेन यामधील शिफ्ंिटग कन्व्हर्टर बेल्ट जोडण्यासाठी शिवाजी पाटील गेले होते. त्यांच्या मदतीसाठी चाराप्पाही गेले होते. मोटारीला बेल्ट बसविताना थप्पीतील जवळपास ३०० पोती या दोघांच्याही अंगावर पडली. यामध्ये शिवाजी यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर चाराप्पा गंभीर जखमी झाले. त्यांना बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.शिवाजी यांनी आयटीआय करून फिटर पदवी घेतली होती. ते कुशल कामगार म्हणून कारखान्यात परिचित होते. नरगुंद (विजापूर), दौलत कारखाना (हलकर्णी) येथे काही वर्षे त्यांनी नोकरी केली होती. कारखाना उभारणीच्यावेळी त्यांचे कौशल्य बघून व्यवस्थापनाने त्यांना कायमस्वरूपी नोकरी दिली होती. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात दिला. कुद्रेमानी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. याबाबतची वर्दी इम्रान हुसेन सय्यद यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. एम. रेडेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)