शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

संततधारेचे दिवस सरले, आता तडाखे वादळांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

कोल्हापूर : बदललेले वातावरण पाहता संततधार पावसाचे दिवस आता सरले असून, येथून पुढे वादळी पावसावरच मदार राहणार आहे. याला ...

कोल्हापूर : बदललेले वातावरण पाहता संततधार पावसाचे दिवस आता सरले असून, येथून पुढे वादळी पावसावरच मदार राहणार आहे. याला अपवाद फक्त सोमवारपासून सुरू होणाऱ्या हस्त नक्षत्राचा राहील; पण तो पाऊस ढग उतरेल तिथेच पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला तरच सलग दोन-तीन दिवस पडेल, अन्यथा ऑक्टोबर हिट व गडगडाटी पावसाची सवय करून घ्यावी लागणार आहे.

यावर्षी संपूर्ण एप्रिल व मे महिन्यात वळवाच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले. जूनमध्ये अशाच पावसामुळे पुराची परिस्थिती तयार होता होता निवळली. त्यानंतर जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत उन्हाचे चटके बसवणाऱ्या पावसाने त्यानंतर मात्र अवघ्या चार-पाच दिवसांत प्रलयकारी महापूरच आणला. पाऊस थांबल्याने महापूर वेगाने ओसरला, पण ही उघडीप वाढतच गेली. अधूनमधून तुरळक सरी पडत राहिल्या, पण त्याला म्हणावा तसा जोर राहिला नाही. पावसाची सर्व नक्षत्रे संपली तरी महापूर येण्याआधी पडला तसा संततधार पाऊस जिल्ह्यात पडलाच नाही. बदललेल्या ऋतुमानाचा हा खेळ बघतच पिकांची काढणी, मळणी सुरू झाली. सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी उघडीप मात्र आता चिंतेत बदलली आहे. उत्तरा नक्षत्र चांगले बरसेल अशी आशा होती, पण आता नक्षत्र संपण्यास तीन दिवस उरले तरी मोठा पाऊस झाला नाही. ढग भरून येत आहेत, पण अगदीच तुरळक पाऊस पडत आहे. पुन्हा उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे.

आता सोमवारपासून हस्त नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्रात चांगला पाऊस पडतो, शिवाय हा मुरवणीचा पाऊस असल्याने भूजल साठ्यात वाढ होण्यासाठी पाऊस आवश्यक असतो. पण यावर्षी हा पाऊस देखील हुलकावणी देईल असा पारंपरिक अंदाज आहे. तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज शुक्रवारपासून चार दिवस तुरळक का असेना; पण पावसाचे राहणार आहेत. पुन्हा पाऊस ओढ घेईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुनरागमन करेल, पण हा पाऊस देखील सततचा असणार नाही. तर ढग उतरेल तेथे वादळासारखा हा पाऊस पडणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आह. तो मध्य भारताच्या दिशेने सरकला तर मात्र पावसाचा मुक्काम वाढणार आहे. तथापि गुजरातच्या दिशेने वारे जोरात सरकत असल्याने पाऊस हुलकावणी देईल असा अंदाज आहे.