शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’ प्रेमीयुगुलांचा अड्डा

By admin | Updated: January 13, 2015 00:16 IST

गणेश मंदिर परिसराला अवकळा : सावळा गोंधळ थांबवण्याची मागणी

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना परिसरात असलेल्या गणेश मंदिराला दौलत कारखाना बंद असल्याने अवकाळ प्राप्त झाली असून हा परिसर सध्या प्रेमीयुगुल व मद्यपीचा अड्डा बनला आहे. मंदिरावर सध्या सुरक्षारक्षक नसल्याने रोज ८ ते १० प्रेमीयुगुल येथे दिसत आहेत.दौलत कारखाना व्यवस्थापनाच्या अधिपत्याखाली येथील टेकडीवर सुरेख गणेश मंदिर उभे करण्यात आले आहे. मंदिराची भव्य इमारत, सुंदर बगीचा, कारंजे, विद्युत रोषणाई, टेकडीवरून दिसणारी परिसरातील हिरवीगार शेती यामुळे हे मंदिर एक प्रेक्षणीय स्थळ वाटत होते. अशा ठिकाणी चंदगडसह जवळपास तालुक्यातील शाळांच्या सहलीही येत होत्या. संकष्टी दिवशीही तर येथे गोठी गर्दी असायची. अशा या रमणीय स्थळाला दौलत बंद झाल्याने मरणासन्न अवस्था परसली आहे.दरम्यान, दौलत वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांनी प्रेमीयुगुलांना बऱ्याच वेळा हकलण्याचा प्रयत्न केला असता ते कामगारांनाच उद्धट उत्तरे देतात. येथील महाविद्यालयातील युवक-युवतींचीही या परिसरात वर्दळ असते. दौलत व्यवस्थापनाने मंदिर परिसरात दौलत विश्वस्त शिक्षक संस्थेचा कर्मचारी पाठवून या ठिकाणी चाललेला सावळा गोंधळ थांबवावा. तसेच परिसराची स्वच्छता करून मंदिराचे पावित्र्य राखावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

माणसांची वर्दळ कमी
परिसरातील बागेत झुडपे वाढली आहेत. आजूबाजूला असलेली फुलाची झाडे तोडून नेल्याने परिसर भयाण वाटत आहे. ‘दौलत’ बंद झाल्याने मंदिरावर असलेला सुरक्षा रक्षक, वायरमन, माळी आदी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्याने या ठिकाणी माणसांची वर्दळ कमी झाली.
या परिसरातील प्रेमीयुगुल व बेळगाववरून येणारे प्रेमीयुगुल या मंदिर परिसराचा उपयोग करून घेत आहेत, तर काही मद्यपी युवक येथे बसून दारू पित आहेत. या ठिकाणी प्लास्टिक व काचेच्या बाटल्यांचा खच पडला आहे.