शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दत्तभक्तांना दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:04 IST

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी : कृष्णा व पंचगंगा या दोन पवित्र नद्यांची पाणीपातळी कमी-जास्त होतेय

प्रशांत कोडणीकर । लोकमत न्यूज नेटवर्कनृसिंहवाडी : पावसाने वेळाने केलेले आगमन व अनियमितपणामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन पवित्र नद्यांची पाणीपातळी कमी-जास्त होत आहे. श्रावण पौर्णिमा जवळ येऊनही येथील दत्त मंदिरापर्यंत नद्यांची पाणीपातळी न पोहोचल्याने असंख्य दत्तभक्त व ग्रामस्थांना दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नृसिंहवाडी येथे सध्या कन्यागत पर्वकाल चालू असून, दक्षिणद्वार व पर्वकाल योगावर दक्षिणद्वार येथे स्नान करण्यासाठी भक्त पावसाची वाट पाहत आहेत.सर्वसाधारणपणे आषाढी अखेरीस किंवा श्रावण महिन्याच्या सुरुवातीस येथील दत्त मंदिरात पाणीपातळी वाढल्याने दक्षिणद्वार सोहळा होतो. या सोहळ्यात मंदिराच्या दक्षिण बाजूच्या दरवाजात स्नान करण्यासाठी इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली, कोल्हापूर, उगार, चिकोडी, बेळगाव यांसह अनेक ठिकाणांहून भाविक हजेरी लावतात. अजूनही मंदिरात कृष्णा नदीचे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे असंख्य भाविक दक्षिणद्वार सोहळ्याकडे टक लावून बसले आहेत.येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून, समोर वाहणारी कृष्णा नदी दक्षिण दिशेकडे वाहते. सातारा, कऱ्हाड, सांगली, गगनबावडा, राधानगरी, कोल्हापूर, आदी ठिकाणांचे सर्व पाणी नृसिंहवाडीकडे येत असल्याने येथील पाणीपातळी पावसाळ्यात झपाट्याने वाढते व नदीचे पाणी वाढल्याने ते लवकरच येथील दत्त मंदिरापर्यंत पोहोचते. दक्षिणद्वार सोहळ्यावेळी मंदिराच्या उत्तरद्वारातून शिरलेले कृष्णा नदीचे पाणी श्रींच्या मनोहर चरणकमलाला स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात. यावेळी दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे म्हणजेच पुण्यकारक मानले जाते. या सोहळ्यात स्नान केल्याने मानवांच्या पापांचा ऱ्हास होऊन पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.