शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘गॅलिडियर’ शेतीतून दररोज उत्पन्न

By admin | Updated: December 9, 2014 00:26 IST

कोगे येथील कृष्णात चव्हाण यांचा शेतीत प्रयोग : गुलाब शेतीतून सलग सहा वर्षे उत्पन्नाचा स्रोत

प्रकाश पाटील - कोपार्डे -नोकरीची शाश्वती नसली तरी हक्काची शेती होती. जवळपास ८ ते १० एक र जमीन असली तरी ती पारंपरिक ऊस पीक शेतीसाठीच वापरली जात होती. यातून मिळणारे उत्पन्न हे ऊस तुटून गेल्यानंतर साखर कारखानदार कधी देतील तेव्हाच, म्हणून कोगे (ता. करवीर) येथील तरुण शेतकरी कृष्णात दत्तात्रय चव्हाण याने दररोज शेतीतून किमान उत्पन्नाचा स्रोत राहावा यासाठी शोध सुरू केला. त्यातून त्यांना गॅलिडियर (गुलाब) हा पर्याय मित्रांनी सुचविला. यातून माहिती व तंत्रज्ञान घेत त्यांनी जून २००९ मध्ये आपल्या जमिनीतील केवळ अर्धा एकर जमीन गुलाब शेतीखाली आणली आहे. कृष्णात चव्हाण हे ‘गोकुळ’मध्ये रोजंदारीवर होते. मात्र, बरीच वर्षे नोकरी करूनही रोजंदारी नोकरीला कायम नोकरीची हमी मिळेना. त्यातच ८ ते १० एकर असणारी जमीन दुर्लक्षित होऊ लागली म्हणून त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. मात्र, दररोजचा घरखर्च व शेतीचा खर्च भागविण्यासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण मार्ग स्वीकारायचा प्रयत्न त्यांनी केला. मित्राच्या सल्ल्याने त्यांनी गुलाबशेती करण्याचा निर्णय घेतला. जून २००९ मध्ये कृष्णात यांनी आष्टा (ता. वाळवा) येथून गॅलिडियर (गुलाब)ची जंगली रोपे आणून २० गुंठ्यांत लावण केली. डिसेंबर २००९ मध्ये टपोरी गुलाबाची फुले लागू लागली. तासगाव, विटा या भागांत दुष्काळी परिस्थिती असल्याने तेथून गुलाब फुलांची कोल्हापूरमध्ये आवक कमी होती. त्यातच लग्नसराई असल्याने या हंगामात फुलाला ५ रुपयांपासून १० रुपयांपर्यंत दर आला. पहिल्याच वर्षी किमान दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. तेव्हापासून याच रोपांच्या लावणीतून सतत सहा वर्षे आपण किमान वार्षिक लाख ते सव्वा लाख रुपये घेत आहे. दररोज टपोरी फुलांची झाडांना आवक होत असते. दररोज ३०० ते ४०० रुपयांची फुले आपण शेतात, गावात व बाजारात विकत असल्याचे सांगत गॅलिडियर शेती (गुलाब शेती) फायद्याची असल्याचे सांगितले. सर्व खर्च वजा जाता ७० ते ८० टक्के नफा राहत असल्याचेही कृष्णात चव्हाण यांनी सांगितले. ही शेती उसासारखी आळस करून चालत नाही. दररोज हवामानाप्रमाणे कीड व रोगांचे निरीक्षण करून कीटकनाशक फवारणी करावी लागते. इतर पिकांना जी खते आहेत तीच वापरात आहे. आता ठिबक पद्धतीचा अवलंब केल्याने महिन्यातून एकदाच खुरपणी करावी लागते. ऊसशेतीला पूरक अशी गॅलिडियर शेती (गुलाब शेती) होऊन दररोजचा आर्थिक स्रोत मिळू शकतो. - कृष्णात चव्हाण