डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजारावरील विशेष कक्षास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST2021-02-20T05:11:25+5:302021-02-20T05:11:25+5:30

कसबा बावडा : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष व अभिमत विद्यपीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य ...

D. Y. Commencement of special ward on spinal diseases at Patil Hospital | डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजारावरील विशेष कक्षास प्रारंभ

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या आजारावरील विशेष कक्षास प्रारंभ

कसबा बावडा :

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष व अभिमत विद्यपीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात मणक्याच्या आजारावरील बाह्यरुग्ण विभागाचा (ओपीडी) गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. हॉस्पिटलचा अस्थिरोग विभाग व स्पाईन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या या ओपीडी विभागाचे उद्‌घाटन डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.

या कार्यक्रमास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. वैशाली गायकवाड उपस्थित होत्या.

या बाह्यरुग्ण विभागात समाजातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत तपासणी केली जाणार आहे. सवलतीच्या दरात सिटीस्कॅन व एमआरआय तपासण्या केल्या जाणार आहेत.

दर शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही सेवा उपलब्ध असेल.

Web Title: D. Y. Commencement of special ward on spinal diseases at Patil Hospital