डी. सी. नरके यांना ११० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST2021-04-12T04:22:50+5:302021-04-12T04:22:50+5:30

कोपार्डे : कुंभी कासारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. डी. सी. नरके यांना ११०व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ...

D. C. Greetings to Narake on the occasion of his 110th birth anniversary | डी. सी. नरके यांना ११० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

डी. सी. नरके यांना ११० व्या जयंतीनिमित्त अभिवादन

कोपार्डे : कुंभी कासारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. डी. सी. नरके यांना ११०व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी प्रशासकीय कार्यालयासमोर असणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्यास मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित पुष्पहार अर्पण िकरण्यात आला.

यावेळी अध्यक्ष चंद्रदीप नरके म्हणाले, स्व. डी. सी. नरके यांनी नेहमी शेतकरी सभासदांचा विचार समोर ठेवून कुंभी कासारीची वाटचाल सुरू ठेवली होती. त्यांचेच विचार नरके कुटुंबीय समोर ठेवून सहकारात काम करत आहेत.

यावेळी संचालक पी.के. पाटील, जयसिंग पाटील (यवलुज) दादासाहेब लाड, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सेक्रेटरी प्रशांत पाटील, सुरक्षा अधिकारी बबन पाटील, कामगार प्रतिनिधी विलास गुरव, सीडीओ तानाजी पवार, रमेश तळसकर, इलेक्ट्रिक इंजिनिअर तरकसबंद, बी. एम. पाटील, सागर पाटील, उमाजी शिरगावकर, संभाजी इंजुळकर उपस्थित होते

फोटो -- कुंभी कासारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. डी. सी. नरके यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक अशोक पाटील, संचालक पी. के. पाटील, जयसिंग पाटील, दादासाहेब लाड, सेक्रेटरी प्रशांत पाटील.

Web Title: D. C. Greetings to Narake on the occasion of his 110th birth anniversary