अनाधिकृत बांधकामप्रकरणी तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:48+5:302021-02-05T06:55:48+5:30
कोल्हापूर : संभाजीनगर येथे प्राथमिक शाळेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला ...

अनाधिकृत बांधकामप्रकरणी तिघांवर गुन्हा
कोल्हापूर : संभाजीनगर येथे प्राथमिक शाळेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. गणेश उत्तम पतंगे, वैजयंती कमलाकर हावळ, कमलाकर वामन हावळ (सर्व रा. संभाजीनगर, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संभाजीनगरातील सि.स.नं. १९२४-अ/१-अ/२-क/१-अ या सार्वजनिक, निमसार्वजनिक व प्राथमिक शाळेच्या विस्तारासाठी आरक्षित केलेल्या जागेवर गणेश पतंगे, वैजयंती हावळ व कमलाकर हावळ या तिघा संशयितांनी अनाधिकृत बांधकाम केले. त्यांना याप्रकरणी कोल्हापूर महापालिका नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता मयुरी पटवेगार (रा. गणपती पेठ, सांगली) यांनी व तत्कालीन कनिष्ठ अभियंता विवेक चव्हाण यांनी नोटीस दिली. यातील संशयितांनी अनधिकृत केलेले बांधकाम थांबवले व काढून न घेतल्याने तक्रारीनुसार जुना राजवाडा पोलिसात तिघांवर गुन्हा नोंदवला आहे.