तीनपानी जुगार खेळणाऱ्या दहाजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:24 IST2021-05-10T04:24:21+5:302021-05-10T04:24:21+5:30

इचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील कारंडे मळ्यामध्ये तीनपानी जुगार खेळत असल्याप्रकरणी दहाजणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ...

Crime against ten gamblers | तीनपानी जुगार खेळणाऱ्या दहाजणांवर गुन्हा

तीनपानी जुगार खेळणाऱ्या दहाजणांवर गुन्हा

इचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील कारंडे मळ्यामध्ये तीनपानी जुगार खेळत असल्याप्रकरणी दहाजणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा अकरा हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. ८) रात्रीच्या सुमारास केली.

फारूक इसाली मुजावर (वय ४२), हुसेन गौस अंकलगी (४१), श्रीशैल करवसू जमंगी (३४), बसू रामाप्पा हिप्परगी (३४), इसाकमोद्‌दीन अल्लाउद्दीन इनामदार (४६), रमजान ममुलाल मुल्ला (४६), महेश अण्णाप्पा डोंगे (३१), मिलिंद शंकर घबाले (४२), अहमद रुकमोद्दीन शिरोळे (५०, सर्व रा. कारंडे मळा) व अशोक सहदेव डोंगरे (३८, रा. साईनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हे सर्वजण मिलिंद घबाले याच्या घराच्या पाठीमागील बाजूस तीनपानी जुगार खेळत होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकून कारवाई केली.

Web Title: Crime against ten gamblers