महिलेवरील अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:19 IST2021-06-05T04:19:13+5:302021-06-05T04:19:13+5:30

कोल्हापूर : गतिमंद विवाहितेस चांगली नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा नोंद ...

Crime against one in a case of atrocities against women | महिलेवरील अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा

महिलेवरील अत्याचारप्रकरणी एकावर गुन्हा

कोल्हापूर : गतिमंद विवाहितेस चांगली नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा नोंद झाला. आसिफ आलम (रा. खुर्लीया, पश्चिम बंगाल) असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पश्चिम बंगालमधील गतिमंद विवाहीत महिलेस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला चांगली नोकरी लावते, असे आमिष दाखवून संशयित आलम याने प्रथम तिला मुंबईतील अंधेरीमध्ये आणले. यावेळी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करताच तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पीडितेस कोल्हापूरात आणूस सोडत संशयिताने पलायन केले. ही महिला करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असता पोलिसांनी विचारपूस केली. तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी संशयित आलम विरोधात गुन्हा नोंदवला. तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Web Title: Crime against one in a case of atrocities against women