शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम, सुसंस्कारित समाज घडवायचाय

By admin | Updated: December 17, 2014 23:11 IST

आरोग्य, शिक्षण आणि संस्कार यावर काम करणार : डी. ए. पाटील--थेट संवाद

संघटनेच्या अस्तित्वामुळे समाज निर्भय होतो. सामर्थ्यशाली व स्वाभिमानी होतो. अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढण्याची शक्ती येते. हाच अनुभव लक्षात घेऊन दक्षिण भारत जैन सभा अनेक वर्षांपासून समाजात काम करत आहे. सुसंस्कारित समाज घडविण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. विद्यार्थ्यांना चांगले आरोग्य मिळाले, तर त्यांचा बौद्धिक विकाससुद्धा उत्तम होऊ शकतो. बौद्धिक विकासाबरोबरच संस्कार झाले तर चांगला समाज निर्माण होऊ शकतो, यावर आमचा विश्वास असल्यामुळेच यापुढच्या काळात आम्हाला आरोग्य, शिक्षण आणि संस्कार यावर चांगले काम करायचे आहे, असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन प्रा. डी. ए. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. दक्षिण भारत जैन सभेचे ९४ वे त्रैवार्षिक अधिवेशन २० व २१ डिसेंबर असे दोन दिवस कोल्हापुरात होत आहे. या अधिवेशनास सुुमारे दहा हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. धार्मिक व परोपकारी वृत्ती, निर्व्यसनी, सुसंस्कारीत समाज अशी ओळख असलेल्या जैन समाजाच्या दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यालयाची जाणीव करून देण्यासाठी प्रा. डी. ए. पाटील यांच्याशी केलेली ही थेट बातचित! प्रश्न : दक्षिण भारत जैन सभा कधी स्थापन झाली व तिचा हेतू काय होता?उत्तर : दक्षिण भारत जैन सभेची स्थापना दि. ३ एप्रिल १८९९ मध्ये स्तवनिधी येथे झाली आहे. जैन समाजाची ही एक प्रातिनिधीक संस्था म्हणून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहिली आहे. सभेच्या स्थापनेच्या काळात जैन समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या खूपच मागासलेला होता. धार्मिक क्षेत्रात कुरूढीने वेढलेला होता. शहरी भागातील समाज थोडा व्यापार उद्योगात धडपडत होता मात्र, ग्रामीण भागात मात्र मोलमजुरी व अल्पशेतीवर गुजराण करत होता. ‘ना शिक्षण ना प्रतिष्ठा’ अशा अवस्थेत जैन समाज कसातरी टिकून होता. समाजाची गरज ओळखून तो शिक्षित व्हावा, यासाठी समाजधुरिणांनी सभेची स्थापना केली. प्रश्न : कामाला कशाप्रकारे सुरुवात झाली ?उत्तर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन सभेने सुरुवातीला शहरी भागात प्रथम वसतिगृहे चालू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेता यावे, हा त्यामागचा हेतू होता. अल्पखर्चात जेवण व राहण्याची सुविधा वसतिगृहांच्या माध्यमातून सुरू केली. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि गरज लक्षात घेत वसतिगृहांची संख्या वाढत गेली. सध्या कोल्हापूर, सांगली, बेळगांव, हुबळी, इचलकरंजी यासह कर्नाटकातही मुलांची वसतिगृहे सुरू आहेत. सांगली, कोल्हापूर, कागल, औरंगाबाद येथे मुलींची वसतिगृहेसुद्धा चालविली जातात.प्रश्न : किती शाळा चालविल्या जात आहेत ?उत्तर : सभेच्यावतीने कोल्हापूर, सांगली, जळगाव आदी ठिकाणी चार शाळा चालविल्या जातात. या शाळांतून १७०० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. अंबड जळगांव येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली असून, तेथे नर्सरी ते दहावीपर्यंत ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी ३६ खोल्यांची तीनमजली इमारत संस्थेने उभी केली आहे. अलीकडेच बुधगाव येथे वीर सेवादलामार्फत लिटल स्टार इंग्लिश स्कूल सुरू केले आहे.प्रश्न : सभेच्या कार्यक्षेत्राबाबत थोडी माहिती सांगा.उत्तर : सभेचा कार्यविस्तार सांगली, कोल्हापूर, उत्तर कर्नाटक व मराठवाडा अशा मर्यादित स्वरुपात न राहता तो मुंबई, कोकण, गोवा येथेही झाला आहे. या विभागातही अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याध्ये धर्मक्षेत्र रक्षण, नियतकालिक, आर्थिक संस्थेमार्फत अर्थसहाय्य, विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण, समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येतो. प्रश्न : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कशी दिली जाते. उत्तर : सभेने सुरुवातीपासूनच शिक्षणाकडे जबाबदारीने लक्ष दिले आहे. वसतिगृहातील व बाहेरील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद केली आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सभेने १ कोटी ३५ लाखांचा निधी जमविला आहे, त्याच्या व्याजातून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. आजअखेर हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. नुकतीच सभेने ‘लक्ष-लक्ष शाश्वत शिष्यवृत्ती योजना’ अमलात आणली आहे. प्रश्न : अन्य शाखांचे कामकाज कसे चालते?उत्तर : सभेची वीर सेवादल ही युवकांची शाखा असून तिची स्थापना १९७९ मध्ये झाली आहे. यामध्ये युवकांना सामावून घेण्यात आले असून त्यांच्यामार्फत २०० पाठशाळांतून युवापिढीवर संस्कार व व्यसनापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. शाकाहार, वृक्षारोपण याचे महत्त्वही सांगितले जाते. वीर महिला मंडळ शाखेने धार्मिक विभागात जनजागरणाचे काम हाती घेतले आहे. स्त्री भ्रूणहत्याबाबत जनजागृतीचे काम चांगल्या पद्धतीने केले आहे. पदवीधर संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाते.- भारत चव्हाण