शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआरच्या डॉक्टरनी रत्नागिरीच्या रुग्णाचे वाचवले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : त्याला जेव्हा ७ जानेवारीला सीपीआरमध्ये दाखल केले, तेव्हा तो बेशुद्ध होता. अंग निळे पडले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : त्याला जेव्हा ७ जानेवारीला सीपीआरमध्ये दाखल केले, तेव्हा तो बेशुद्ध होता. अंग निळे पडले होते. नंतर तीन दिवस व्हेन्टिलेटरवर होता. स्नायू कमजोर पडले होते. मात्र, येथील सीपीआरच्या डॉक्टरनी प्रयत्नांची शर्थ केली आणि त्याला अक्षरश: मरणाच्या दाढेतून बाहेर काढले. कास (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील अरमान महंमद चौगुले याला जीवदान दिल्यामुळे चौगुले कुटुंबीयांनी मंगळवारी डिस्चार्ज घेताना सर्व डॉक्टरांविषयी पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली. त्याला सर्पदंश झाल्याचे चार दिवसांनंतर निदान झाले.

अरमान हा १४ वर्षांचा मुलगा. ७ जानेवारीला तो झोपेतून उठला तर त्याच्या तोंडाला फेस येत होता. तो उठला आणि चक्कर येऊन खाली पडला. त्याला तत्काळ चिपळूण तालुक्यातील रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यावेळी तो निळा पडून बेशुद्ध पडला होता. तेथील डॉक्टरांनी व्हेन्टिलेटरवर ठेवले. परंतु, निदान न झाल्याने त्याला कोल्हापूरला आणण्यात आले. या ठिकाणी नातेवाईकांसह जंगेश पठाण, बंटी सावंत यांनी चर्चा करून त्याला सीपीआरमध्येच दाखल करण्यात आले.

सीपीआरमध्येही तीन दिवस उलटले तरी निदान होत नव्हते. त्याचे सर्व कपडे काढून निरीक्षण करण्यात आले. अखेर त्याच्या तळपायाला टोचल्याच्या दोन खुणा दिसल्या आणि सर्पदंश झाल्याचे निष्पन्न झाले. तातडीने उपचार सुरू करण्यात आले. यानंतरच्या तीन दिवसांत व्हेन्टिलेटर काढण्यात आले. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली आणि त्याला मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, उपचार करणारे औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. महेंदर बनसोडे, डॉ. गिरीश पाटील, डॉ. आशिष बोचरे, डॉ. प्रवीण बागुल, डॉ. श्रीकृष्ण कमठानकर, डॉ. आस्था बिजवे, डॉ. सारंग काकडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन चौगुले कुटुंबीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सीपीआरमुळे मुलाला जीवदान मिळाल्याच्या भावना महंमद चौगुले यांनी व्यक्त केल्या. यावेळी हिशामुद्दीन चौगुले, अशरफ चौगुले, फहद मुजावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सेवा देणारे विनय, अविनाश, अमित, राजश्री, अपूर्वा या नर्सिंग कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.

१९०१२०२१ कोल सीपीआर ०१

कास (जि. रत्नागिरी) येथील चौगुले कुटुंबीयांच्या वतीने सर्पदंश झालेल्या मुलाला जीवदान दिल्याबद्दल सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, डॉ. महेंदर बनसाेडे यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला.