शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ

By admin | Updated: June 20, 2017 01:13 IST

‘गोकुळ’चा निर्णय : आजपासून अंमलबजावणी; म्हैस दूध दर ‘जैसे थे’

लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गाय व म्हैस खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्याचे आदेश दिले असले तरी ‘गोकुळ’चा म्हैस दूध दर शासनापेक्षा ३ रुपये ४० पैसे जास्त आहे. त्यामुळे केवळ गाय दूध खरेदी दरात वाढ केली जाणार आहे. शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसह दूध दरवाढ करण्याची मागणी करत आंदोलन केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संघटना प्रतिनिधींशी चर्चा करताना २० जूनपूर्वी दूध दरवाढीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. दूध दरवाढीसाठी समिती नेमली होती, या समितीची १५ जूनला बैठक होऊन गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपये वाढीची सूचना केली होती. त्यानुसार सोमवारी राज्य सरकारने दरवाढीबाबत आदेश काढला. उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणप्रतीच्या गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ केली. सध्या या प्रतीच्या दुधासाठी २४ रुपये दर आहेत त्यात वाढ करून २७ रुपये द्यावा व येथून ३.६ ते ५.० प्रतिपॉर्इंट वाढीव फॅटसाठी ३० पैसे इतकी वाढ देण्याचे आदेश दिले आहेत. म्हशीच्या ६.० फॅट व ९.० एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाला तीन रुपयांची वाढ करावी, सध्या ३३ रुपये दर असून तो ३६ रुपये प्रतिलिटर द्यावा. त्याचबरोबर ६.१ ते ७.५ पर्यंत वाढीव फॅटसाठी ३० पैसे वाढ कायम ठेवण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. ‘गोकुळ’सध्या म्हैस दुधाला ६.० फॅट व ९.० एसएनएफला ३६ रुपये ४० पैसे तर गाय दूध ३.५ फॅट व ८.५एसएनएफसाठी २५ रुपये प्रतिलिटर दर देते. सरकारच्या दरापेक्षा ‘गोकुळ’चा म्हैस दर तीन रुपये वाढ देऊनही ४० पैसे जादाच आहे. त्यामुळे गाय दुधात वाढ केली आहे. सरकारच्या दरापेक्षा ‘गोकुळ’चा म्हैस दर जादा असल्याने केवळ गायीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे; पण विक्री दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही. - विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)