शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळावर हल्ला केलेल्या गव्याचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

कालकुंद्री (ता. चंदगड) शिवारात बसाप्पा बिराप्पा हारुगेरी या मेंढपाळावर हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या गव्याचा उष्माघाताने कौलगे (ता. ...

कालकुंद्री (ता. चंदगड) शिवारात बसाप्पा बिराप्पा हारुगेरी या मेंढपाळावर हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या गव्याचा उष्माघाताने कौलगे (ता. चंदगड) गावानजीक वनविभागाच्या अखत्यारीतील तळ्याजवळ मृत्यू झाला.

दरम्यान, या गव्याने कुदनूर येथील आनंदी बंबर्गेकर, यल्लूबाई बंबर्गेकर, माधुरी खामकर या तीन महिलांना धडक मारून जखमी केले होते. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील हे जखमीची विचारपूस करण्यासाठी यमकनमर्डी व कुदनूर येथे गेले असता गव्याच्या मृत्यूची बातमी समजली. वनपाल जी. एम. होगाडे, वनरक्षक दीपक कदम, वनमजूर लहू पाटील, वैद्यकीय अधिकारी शिवगण आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पूर्ण वाढ झालेला चार ते पाच वर्षांचा हा नर गवा कळपापासून दूर गेल्याने सैरभैर झाला होता. धावपळीत उष्म्याने हैराण झालेला गवा त्याचा मूळ रहिवास असलेल्या वैजनाथ डोंगर रांगांकडे जाताना मार्गावरील कौलगेनजीक तळ्यात पाणी पिण्यासाठी उरतला असावा. दुर्दैवाने चार दिवसांत झालेल्या पावसामुळे झालेल्या गाळात अडकून धडपडीत त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी येथील तरुणांनी त्याला बाहेर काढण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. पंचनामा व शवविच्छेदनानंतर गव्याला दफन करण्यात आले.

याकामी कौलगेचे पोलीस पाटील सटुप्पा मेणसे, मारुती बिर्जे, सुनील पाटील यांचे सहकार्य लाभले.

दरम्यान, गव्याच्या हल्ल्यात जखमी धनगर बसाप्पा हारुगेरी व महिलांना वनविभागामार्फत नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी सांगितले.

-------------------------

* फोटो ओळी : कौलगे (ता. चंदगड) गावानजीक वनविभागाच्या अखत्यारीतील तळ्यामध्ये मृतावस्थेत आढळून आलेला गवा.

क्रमांक : २१०४२०२१-गड-०५