शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारी प्रकरणाचे नियमितीकरण करण्याचे आदेश न्यायालयामार्फत द्यावेत

By admin | Updated: August 23, 2014 00:08 IST

अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांची माहिती : उच्च न्यायालयात याचिका दाखल

इचलकरंजी : परिसरातील ग्रामीण भागात गुंठेवारी प्रकरणाचे नियमितीकरण करण्यासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे मुदतवाढ देऊन त्याप्रमाणे प्रस्ताव स्वीकारून अशा स्वरूपाची बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणे नियमित करण्याचे आदेश राज्य शासनाला द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. खोतवाडी व कोरोची येथील ग्रामस्थ अशोक सोळसे, कमल खांडेकर, उमेश खांडेकर व इतर तीन लोकांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.परिसरातील ग्रामीण भागात अनेक नागरिक शेतजमिनीचे बेकायदेशीरपणे तुकडे पाडून त्यावर घरे बांधून राहत आहेत. मात्र, शासनदरबारी असा वापर बेकायदेशीर मानला जातो. त्यामुळे २००१ मध्ये अशी गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्यासाठी गुंठेवारी विकास कायदा २००१ राज्य शासनाने अमलात आणला आणि त्यामधील तरतुदीप्रमाणे १ जानेवारी २००१ आधीची गुंठेवारी झालेली प्रकरणे सहा महिन्यांच्या आत संबंधित विभागाकडे अर्ज करून नियमित केली जाणार होती; परंतु या परिसरात या कायद्याची प्रसिद्धी योग्य प्रमाणात झाली नसल्यामुळे सुमारे तीन ते चार हजार प्रकरणे नियमित होऊ शकली नाहीत.म्हणून गुंठेवारी कायद्याप्रमाणे मुदतवाढ देऊन ही प्रकरणे नियमित करून घ्यावीत, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुदतवाढ देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांना नियोजन प्राधिकरण म्हणून आहेत; पण संबंधित अधिकारी प्रस्ताव स्वीकारण्याचे नाकारत आहेत. त्यामुळे गुंठेवारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे मुदतवाढ देऊन प्रस्ताव स्वीकारावेत, असे आदेश राज्य शासन, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. या याचिकेवर न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)