शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

CoronaVirus : जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 6:49 PM

कोल्हापूर : जिल्‌ह्यामध्ये सामाजिक संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचा स्वॅब घेण्याचे धोरण राबविले. त्यामुळे ...

ठळक मुद्देजिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाहीजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली माहिती

कोल्हापूर : जिल्‌ह्यामध्ये सामाजिक संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचा स्वॅब घेण्याचे धोरण राबविले. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत सामाजिक संसर्ग नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.आज दुपारपर्यंत जिल्ह्यामध्ये ३७८ कोरोना बाधित रूग्णांची संख्या आहे. यामध्ये पुणे, मुंबई, रायगड, ठाणे, सोलापूर या रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक एकही रूग्ण नाही.

तपासणी नाक्यांवरून कोव्हिड हॉस्पिटलमध्ये पाठवून स्वॅब घेतला जातो. त्यानंतर त्यांना अलगीकरण केले जाते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. संख्या जरी वाढलेली असली तरी, बाधित कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यांना रूग्णालयात ठेवून उपचार केले जातात. हे रूग्ण आपण शोधलेले आहेत. यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये, याची आपण काळजी घेत आहोत.उपचारानंतर बरे झालेल्या आजअखेर २१ जणांना घरी सोडण्यात आलेले आहे. पुढच्या १० दिवसात मोठ्या प्रमाणावर बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात येईल. कोरोनाने बाधित होऊन मृत्यू झालेल्या रूग्णाची संख्या १ आहे. दुसरा तपासणी करण्यापूर्वी मृत्यू झाला आहे, त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हे २ मृत्यू जरी धरले तरी जिल्ह्यामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात यशस्वी झालो आहोत.

ज्या रूग्णांना मधुमेह, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, कर्करोगचा व्याधी आहे, अशा रूग्णांची विशेष काळजी घेतली जाते. अशा व्याधी असणाऱ्या कोरोना बाधितांना सी.पी.आर. आणि डॉ. डी.वाय.पाटील रूग्णालयात उपचार देण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर