शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus InKolhapur : दिवसभरात ३७ कोरोनाबाधीत रुग्ण वाढले; ६ रुग्णांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 19:10 IST

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, सोमवारी सायंकाळपर्यत सुमारे ३७ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडल्याने ही संख्या ३७८ पर्यत पोहचली. वाढती संख्यामुळे आरोग्ययंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. एकीकडे कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असतानाच सीपीआर रुग्णालयातून दिवसभरात सहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यत सुमारे २४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज  देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात कोरोनाबाधीतांची संख्या ३७८ वरदिवसभरात आतापर्यत जिल्ह्यात २४ जणांना डिस्चार्ज 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, सोमवारी सायंकाळपर्यत सुमारे ३७ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडल्याने ही संख्या ३७८ पर्यत पोहचली.

वाढती संख्यामुळे आरोग्ययंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. एकीकडे कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असतानाच सीपीआर रुग्णालयातून दिवसभरात सहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यत सुमारे २४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज  देण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. दिवसेदिवस वाढती संख्या कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातील नागरीकांना विशेष पासवर कोल्हापूरात प्रवेश देण्यास प्रारंभ झाल्यापासून कोल्हापूरात कोरोनाबाधीतांची संख्या गेल्या १५ दिवसात वाढली आहे. रविवारी ही संख्या ३४१ वर पोहचली होती.

सोमवारी दिवसभरात सायंकाळपर्यत सुमारे ३९ अहवाल कोरोनाबाधीत प्राप्त झाले. पण या प्राप्त झालेल्या चाचणी अहवालात आजरा तालुक्यातील दोन बाधीतांचे अहवाल दुसऱ्यांदा बाधीत आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सायंकाळपर्यत कोरोनाबाधीतांची संख्या ३७८ वर पोहचली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १०४ कोरोनाबाधीत रुग्ण हे शाहूवाडी तालुक्यात आढळले आहेत.दरम्यान, आणखी सहा रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने ते कोरोनामुक्त झाले. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांना सोमवारी सायंकाळपर्यत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून आतापर्यत सुमारे २४ बाधीत रुग्ण चांगले झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सीपीआरमधील डॉक्टर व कर्मचार्यांचे हे यश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर