शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

CoronaVirus : बेळगावात दोन वर्षीय केरळ रिटर्न बालिका कोरोना पॉझिटिव्ह,चार नवीन रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 3:32 PM

बेळगाव : बेळगावात मंगळवारी १३ रुग्णांची वाढ झाल्या नंतर बुधवारीदेखील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली असून बुधवारी दुपारी चार ...

ठळक मुद्देबेळगावात चार रुग्णांची वाढदोन वर्षीय केरळ रिटर्न बालिका कोरोना पॉझिटिव्ह

बेळगाव : बेळगावात मंगळवारी १३ रुग्णांची वाढ झाल्या नंतर बुधवारीदेखील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली असून बुधवारी दुपारी चार नवीन रुग्ण वाढले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रुग्ण संख्या एकूण १४७ झाली आहे. त्यात ८ जण बागलकोट जिल्ह्यातील आहेत. त्यांच्यावर बेळगावात उपचार सुरू आहेत.नवीन चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत २ महिला, एक पुरुष तर एक दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. दोन वर्षीय बालिका केरळ रिटर्न आहे. याशिवाय दोघेजण महाराष्ट्र तर एक जण दिल्ली रिटर्न आहेत.परराज्यातून आलेल्या आणि क्वारंटाइन झालेल्यांत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून बेळगाव जिल्ह्याचा आकडा सतत वाढत आहे. दोन दिवस एकने तर काल १३ ने आकडा वाढला होता, आज ४ ने वाढ झाली आहे.राज्यातील आकडा देखील दररोज १०० ने वाढत असून बुधवारी नवीन १२२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्यातील आकडा देखील २४०५ इतका झाला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक