शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

CoronaVirus : येत्या सहा दिवसांत जिल्ह्यात ९ हजार ३०० जण येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:23 PM

रेडझोनमधून येणाऱ्यांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रेडझोनसह इतर जिल्हे व राज्यांतून येणाऱ्यांना प्रवेश देण्याबात नियोजन केले आहे. त्यानुसार आज, मंगळवारपासून ३१ मेपर्यंत ९ हजार ३०० जणांना प्रवेश दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी सांगितले.

ठळक मुद्देयेत्या सहा दिवसांत जिल्ह्यात ९ हजार ३०० जण येणार जिल्हा प्रशासनाकडून नियोजन : दररोज सरासरी १००० ते १७०० जणांना प्रवेश

 कोल्हापूर : रेडझोनमधून येणाऱ्यांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रेडझोनसह इतर जिल्हे व राज्यांतून येणाऱ्यांना प्रवेश देण्याबात नियोजन केले आहे. त्यानुसार  मंगळवारपासून ३१ मेपर्यंत ९ हजार ३०० जणांना प्रवेश दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.याबाबतची पत्रे त्यांनी ठाणे, पुणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना तसेच मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, सोलापूर येथील पोलीस आयुक्तांना पाठविले आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४००वर गेली आहे. त्यामध्ये रेडझोनच्या जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे. या वाढत्या संख्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात ई-पास परवानेधारक आल्यास जिल्ह्यात त्यांचे अलगीकरण व विलगीकरण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणासाठी सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी होऊन इतर धोके वाढण्याची शक्यता आहे तरी आपल्याकडील ह्यई-पासह्णच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाप्रमाणे परवाने द्यावेत. रेडझोनसह राज्यांतील प्रतिबंधित क्षेत्रांतून इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी असलेल्या केंद्र सरकारच्या मानक प्रणालीनुसार हे परवाने द्यावेत, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.रेडझोनमधून कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी वेळापत्रक (रविवार ते ३१ मे)

                                (पोलीस आयुक्तालय)                        मंगळवार   बुधवार  गुुरुवार   शुक्रवार   शनिवार    रविवार   

  • मुंबई            ६५             १००       १००       १००        १००            १००
  • नवी मुंबई     ५०            ५०           ५०           ५०          ५०             ५०
  • पुणे              ५०            ५०           ५०           ५०           ५०             ५०
  • पिंपरी-चिंचवड ५०         ४५          ५०           ५०           ५०             ५०
  • सोलापूर           २५        २५           २५           २५            २५             २५
  • ठाणे              २००        ३५०         ४००         ४००        ४००           ४००

जिल्हाधिकारी कार्यालय

                           मंगळवार   बुधवार  गुुरुवार    शुक्रवार   शनिवार   रविवार   

  • पालघर (ग्रामीण) १००       १५०         २००       २००          २००         २००
  • पुणे                       ५०           ५०         ५०          ५०             ५०         ५०
  • रायगड                ६०             ९०         १००       १००          १००      १००
  • ठाणे                      ५०          ७५          १००       १००          १००       १००
  • इतर जिल्हे         १४०         २२५         २७५         २७५         २७५       २७५
  • इतर राज्ये           १००        २००         २००         २००         २००        २००
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर