कुडूत्री येथे कोरोनाने मुलगा व वडिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:25 IST2021-05-18T04:25:17+5:302021-05-18T04:25:17+5:30

कुडूत्री येथे कोरोनाने मुलग्यापाठोपाठ वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू कसबा तारळे : कुडूत्री (ता. राधानगरी) येथे चार दिवसांच्या अंतराने मुलगा व ...

Corona's son and father die at Kudutri | कुडूत्री येथे कोरोनाने मुलगा व वडिलांचा मृत्यू

कुडूत्री येथे कोरोनाने मुलगा व वडिलांचा मृत्यू

कुडूत्री येथे कोरोनाने मुलग्यापाठोपाठ वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू

कसबा तारळे : कुडूत्री (ता. राधानगरी) येथे चार दिवसांच्या अंतराने मुलगा व वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाला. दोन्ही कर्त्या पुरुषांचा दुर्दैवी अंत झाल्याने चौगले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला, तर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. मनोहर पिराजी चौगले (वय ३९) व पिराजी आप्पासो चौगले (६८) अशी मृतांची नावे आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी मुलगा मनोहर, वडील पिराजी व घरातीलच एका वृद्ध महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर वृद्ध महिलेला उपचारासाठी राधानगरी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, तर मनोहर व पिराजी या दोघांनीही घरातच अलगीकरण करून उपचार सुरू ठेवले.

यादरम्यान वृद्ध महिला कोविड केंद्रातून उपचार घेऊन घरी आली, तर मनोहर व पिराजी यांच्या उपचारादरम्यान तब्येतीत चढउतार सुरू झाले. अखेर दोन दिवसांनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघेही कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर नियतीने क्रूर डाव साधला.

Web Title: Corona's son and father die at Kudutri