corona virus : कोल्हापुरात रूग्णसंख्या १२ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:38 PM2020-08-13T17:38:29+5:302020-08-13T17:41:23+5:30

कोल्हापूर शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. ही संख्या आता १३ हजार आकड्याकडे झेपावत असल्याचे चित्र आहे.

corona virus: 12,000 patients in Kolhapur | corona virus : कोल्हापुरात रूग्णसंख्या १२ हजार पार

corona virus : कोल्हापुरात रूग्णसंख्या १२ हजार पार

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात रूग्णसंख्या १२ हजार पारमृतांची संख्या ३४१ वर, आगस्टमध्ये कहर सुरूच

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर काही केल्या थांबण्याची चिन्हे नसून दिवसेंदिवस ही संख्या वाढतानाच दिसत आहे. सुरूवातीला ग्रामीण काही तालुके आणि इचलकरंजी वगळता अन्यत्र फारशी बाधा होताना दिसत नव्हती. मात्र आता कोल्हापूर शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. ही संख्या आता १३ हजार आकड्याकडे झेपावत असल्याचे चित्र आहे.

मार्च महिन्यामध्ये कोरोना संसर्ग देशभरात सुरू झाल्यानंतर ११ मार्चला जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. नंतर लगेचच महाराष्ट्रामध्ये लाकडाउनला सुरूवात झाली. याच दरम्यान मुंबई, पुण्याहून हजारो नागरिक रोज गावाकडे परतू लागले. परंतू मार्च महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात केवळ २ रूग्णांचा अहवाल पाझिटिव्ह आला होता.

२६ मार्च २०२० रोजी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला. येथील भक्तीपूजानगर येथे पुण्याहून आपल्या बहिणीकडे आलेल्या गृहस्थाला पहिल्यांना कोरोनाची लागण झाली. लगेचच दोनच दिवसात त्याच्या बहिणीचाही अहवाल पाझिटिव्ह आला. दोघेही खासगी रूग्णालयात उपचार घेवून बरे होवून घरी परतले.


याच दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढत राहिल्याने गावोगावी शाळांमध्ये त्यांची सोय करण्यात आली. या महिन्यामध्ये प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा केवळ या संस्थात्मक अलगीकरणाच्या तयारीमध्ये गुंतली होती. संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये केवळ १२ नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पहिले दोन महिने अगदी नगण्य संख्येने कोरोनाचे रूग्ण आढळले.

मे महिन्यामध्ये मात्र ही संख्या वाढत गेली. शाहूवाडी तालुक्यात एकामागोमाग एक रूग्ण आढळले. इचलकरंजीमध्ये पहिल्यापासूनच कोरोनाचे रूग्ण सापडू लागले. मे महिन्यातील रूग्णांची संख्या ५९३ झाली. तर या महिन्यात ६ जणांचा मृत्यूही झाला. जूनमध्ये पुन्हा ही वाढ कमी होत गेली आणि महिन्याभरातील ही संख्या २४३ वर आली.परंतू ११ जणांचा मृत्यू झाला. जूनपर्यंत ही संख्या प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या आटोक्यातील वाटत होती.

मात्र जुलै महिन्यातील १० तारखेनंतर प्रतिदिन ३०० पासून ७०० पर्यंत कोरोनाचे रूग्ण पाझिटिव्ह येवू लागले. मग मात्र आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येवू लागला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यूही होवू लागल्याने प्रशासनाने ही गोष्ट गांभिर्याने घेतली. तालुका पातळीवर कोविड उपचार केंद्रे तयार करण्याच्या सुचना दिल्या गेल्या. जुलै महिन्यामध्ये नवे ५४६२ रूग्ण आढळले तर १८१ जणांचा मृत्यू झाला. याच दरम्यान खासगी रूग्णालयांमध्ये नागरिकांना दाखल करताना अडचणी येवू लागल्यामुळे महापालिकेला शहरातील अनेक रूग्णालये अधिग्रहित करावी लागली.

जुलैच्या तुलनेत आगस्टमध्ये तर कोरोनाने कहर सुरू केला आहे. जुलै मध्ये महिन्यात ५४६२ रूग्ण आढळले असताना आता १२ आगस्ट रोजी म्हणजे केवळ १२ दिवसात जिल्ह्यात ५९६६ इतके नवे रूग्ण आढळल्याने आणि या १२ दिवसात १६० मृत्यू झाल्यामुळे आता आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

 

Web Title: corona virus: 12,000 patients in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.