आजरा तालुक्यात १५२५३ नागरिकांना कोरोनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:25+5:302021-04-04T04:25:25+5:30

कोरोना लस सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात दिली जात होती. आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, ...

Corona vaccine to 15253 citizens in Ajra taluka | आजरा तालुक्यात १५२५३ नागरिकांना कोरोनाची लस

आजरा तालुक्यात १५२५३ नागरिकांना कोरोनाची लस

कोरोना लस सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात दिली जात होती. आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शासकीय कर्मचारी यांना अग्रक्रमाने कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांनाही कोरोनाची लस देण्याचे काम सुरू आहे.

१ एप्रिलपासून ४५ ते ५९ वर्षांच्या दरम्यान नागरिकांना लस दिली जात आहे. ६० वर्षांवरील १०१२७ तर ४५ ते ५९ वर्षांदरम्यान १९९३ नागरिकांना कोरोना लस दिली आहे.

हेल्थ केअर वर्कर १०३२, फ्रंटलाईन वर्कर - ८०१ असे एकूण १५२५३ नागरिकांना कोरोना लस दिली आहे.

ग्रामीण रुग्णालय, आजरा, उत्तूर, भादवण, वाटंगी, मलिग्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र व गवसे, बेलेवाडी, पेरणोली, शिरसंगी येथील उपकेंद्रातून कोरोना लसीकरण सुरू आहे.

-----------------------

* कोरोनाने ४८ जणांचा मृत्यू

गेल्या वर्षभरात १००५ जण कोरोना बाधित झाले. त्यापैकी ९४५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या १२ जणांवर उपचार सुरू असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनासाठी ६१८९ जणांचे स्वॅब घेतले होते. सर्वांचे अहवाल प्राप्त झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनावणे यांनी दिली.

-----------------------

* कोरोनाबाबत संस्कार वाहिनीवरून प्रबोधन

कोरोनाची लस घेण्याबाबत गावा-गावातील संस्कार वाहिनीवरून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. त्यामुळे सध्या सर्वच लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे.

-----------------------

Web Title: Corona vaccine to 15253 citizens in Ajra taluka