बाहुबलीमध्ये श्वेतांबर जैन ट्रस्टचे कोरोना विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:06+5:302021-05-31T04:19:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, बाहुबली: कुंभोज ग्रामपंचायतीतर्फे बाहुबली येथील जहाज मंदिर परिसरातील श्वेतांबर जैन ट्रस्टच्या यात्री निवासमध्ये ...

Corona Separation Room of Shwetambar Jain Trust at Bahubali | बाहुबलीमध्ये श्वेतांबर जैन ट्रस्टचे कोरोना विलगीकरण कक्ष

बाहुबलीमध्ये श्वेतांबर जैन ट्रस्टचे कोरोना विलगीकरण कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क, बाहुबली:

कुंभोज ग्रामपंचायतीतर्फे बाहुबली येथील जहाज मंदिर परिसरातील श्वेतांबर जैन ट्रस्टच्या यात्री निवासमध्ये कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. या वेळी श्वेतांबर जैन ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल जैन,अभय गांधी,कुंभोजच्या सरपंच माधुरी घोदे उपस्थित होते.

विलगीकरण कक्षात २० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांसाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक यू. सी. मुजावर, शीतल कळंत्रे, वैभव शिंदेवाले यांच्यासह ग्रामस्थांच्या देणगीतून चहा- नाष्टा, जेवणाची व्यवस्था केली आहे.

या वेळी श्वेतांबर जैन ट्रस्टचे ट्रस्टी,उपसरपंच दाविद घाटगे, ग्रामसेवक ए. एस. कठारे, वैद्यकीय अधिकारी आदित्य फडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अजित गोपुडगे, पोलीस पाटील महंमद पठाण,कर्मवीरचे संचालक किरण माळी, माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी उपस्थित होते.

३० बाहुबली कोरोना सेंटर

फोटो-येथील जहाज मंदिर परिसरातील यात्री निवासमध्ये कोरोना विलगीकरण कक्षाची सुरुवात करण्यात आली, या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल जैन,अभय गांधी,माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी व कुंभोज गावातील पदाधिकारी.

Web Title: Corona Separation Room of Shwetambar Jain Trust at Bahubali