शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

CoronaVirus Lockdown : शिवाजी विद्यापीठाचे ‘नॅक’ मूल्यांकन लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 2:04 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या वतीने (नॅक) करण्यात येणारे मूल्यांकन लांबणीवर पडणार आहे. एप्रिलअखेर मूल्यांकनासाठी कोअर टीमच्या विद्यापीठ भेटीवरदेखील अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचे ‘नॅक’ मूल्यांकन लांबणीवरकोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम; समितीच्या भेटीवर अनिश्चिततेचे सावट

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या वतीने (नॅक) करण्यात येणारे मूल्यांकन लांबणीवर पडणार आहे. एप्रिलअखेर मूल्यांकनासाठी कोअर टीमच्या विद्यापीठ भेटीवरदेखील अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.विविध अधिविभाग आणि प्रशासकीय विभाग, विद्यार्थी, महाविद्यालय, अभ्यासक्रम, संशोधनविषयक माहिती विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने संकलित करून त्याचा इन्स्टिट्युशन इन्फॉर्मेशन फॉर क्वालिटी अ‍ॅश्युरन्स (आयआयक्यूए) अहवाल तयार करून तो दि. ३ डिसेंबर रोजी ‘नॅक’च्या पोर्टलवर जमा केला. तो समितीकडून मान्य झाला. त्यानंतर दि. १३ फेब्रुवारीला ‘सेल्फ स्टडी रिपोर्ट’ (एसएसआर) सादर करण्यात आला.

त्याची पडताळणी करून स्टार्टअपचे प्रमाण, प्रदान केलेली शिष्यवृत्ती, आदींबाबतच्या पुराव्यांची मागणी आणि काही त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना ‘नॅक’ने केली. त्याची पूर्तता विद्यापीठाकडून करण्यात आली. त्यानंतर ‘नॅक’कडून ‘डीव्हीव्ही’ची (डेटा व्हॅलिडिटेशन अँड व्हेरिफिकेशन) अभ्यासक्रम, अध्ययन व अध्यापन, संशोधन आणि समाजाभिमुख भूमिका, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना पाठबळ, प्रशासन, उपक्रम व योजना, वेगळेपण या विविध निकषांनुसार विद्यापीठाची विश्लेषणात्मक आणि संख्यात्मक माहिती पूर्तता होऊन एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात कोअर टीमने विद्यापीठाला भेट देऊन, पाहणी करून मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन होते.

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे सध्या डीव्हीव्हीची प्रक्रिया पूर्णत: थांबली आहे. लॉकडाऊनबाबत पुढे काय होईल याची काही कल्पना नाही. डीव्हीव्हीची प्रक्रिया आणि त्यातील अयोग्य वाटणाऱ्या मुद्द्यांना विद्यापीठाने आव्हान देण्याची मूल्यांकन प्रक्रियेत तरतूद आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान एक महिना लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.विद्यार्थी समाधान सर्व्हेक्षणामध्ये अडचणएप्रिलमध्ये मूल्यांकन होणार असल्याचे गृहीत धरून यंदाच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी, अभ्यासक्रम, अध्ययन व अध्यापन, संशोधन आणि समाजाभिमुख भूमिका, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना पाठबळ, प्रशासन, उपक्रम व योजना, वेगळेपण या विविध निकषांनुसार विद्यापीठाची विश्लेषणात्मक आणि संख्यात्मक माहिती विद्यापीठाने सादर केली आहे. मूल्यांकनात विद्यार्थी समाधान सर्वेक्षण हे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांतून केले जाते. या विद्यार्थ्यांची मेमध्ये परीक्षा झाल्यास त्यांना ‘नॅक’च्या कोअर टीमला भेटता येणार नाही. त्यांचे सर्व्हेक्षण करता येणार नाही. त्यासाठी अंतिम वर्षातील नवीन विद्यार्थी येणे, त्यांना मूल्यांकन प्रक्रियेची माहिती देण्यात अधिक वेळ जाणार आहे.

नॅक मूल्यांकनाबाबतची विद्यापीठाच्या पातळीवरील सर्व प्रक्रिया, अहवाल सादर केले आहेत. विविध अधिविभागप्रमुखांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीत वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून आपापल्या विभागांची सादरीकरणे तयार केली आहेत.- डॉ. आर. के. कामत,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ