शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : कोरोनाचा संसर्ग, मृत्यूदर कमी करा : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:06 IST

corona cases in kolhapur : गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज,आजरा व चंदगड तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मृत्यूदर चिंताजनक असून तो कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी केली.

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग, मृत्यूदर कमी करा : हसन मुश्रीफगडहिंग्लज येथील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

गडहिंग्लज : गडहिंग्लज उपविभागातील गडहिंग्लज,आजरा व चंदगड तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मृत्यूदर चिंताजनक असून तो कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी केली.गडहिंग्लज विभागातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.शासकीय आरोग्य यंत्रणेसह संबंधित सर्व विभागांच्या कोरोना लढ्यातील कामगिरीबद्दल समाधानही त्यांनी व्यक्त केले.यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे,प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.चंद्रकांत खोत, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.मुश्रीफ म्हणाले,कोरोनाची लक्षणे असतानादेखील अनेकजण उपचाराला उशीर करीत आहेत.त्यामुळे मृत्युदर वाढत आहे.त्यामुळे जनजागृतीबरोरच लोकांनीही चाचणी व उपचारासाठी पुढे येण्याची गरज आहे. कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्यांच्या चाचण्या वाढवा,त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरणातच ठेवा.त्यासंदर्भात तलाठी व ग्रामसेवकांसह ग्राम दक्षता व प्रभाग दक्षता समित्यांना सतर्क करा, असा आदेशही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक हारूण सय्यद, बसवराज खणगावे,नितीन देसाई,अनुप पाटील, गुंड्या पाटील महेश सलवादे आदी उपस्थित होते.आरोग्य मंत्र्यांसोबत लवकरच बैठकगडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या सीटीस्कॅन मशीनसाठी निधी देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.दवाखान्यात दुसरा ऑक्सीजन प्लांट बसविणे व ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात लवकरच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक घेणार आहोत, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर