शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस इचलकरंजी झोपडपट्टीमुक्त करणार

By admin | Updated: September 7, 2014 23:21 IST

प्रकाश आवाडे यांची माहिती : नवीन भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन

इचलकरंजी : यंत्रमागाचे केंद्र असल्यामुळे इचलकरंजी शहरात कामगार वस्ती अधिक आहे. त्यामुळे काही ठिकाणी झोपडपट्ट्या वसल्या आहेत. कॉँग्रेसच्या आघाडी सरकारच्या विविध योजनांमधून सध्या झोपडपट्टीवासीयांना घरकुले बांधून दिली जात आहेत. उर्वरित झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनातून लाभार्थ्यांना घरकुले देऊन शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा कॉँग्रेसचा निर्धार आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत १८१ लाभार्थ्यांना घरकुले बांधण्याची पायाभरणी व नवीन भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन अशा संयुक्त कार्यक्रमामध्ये आवाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या.आवाडे म्हणाले, नगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या एकूणच विकासकामांचा आढावा घेतला. विकासकामे व लोकाभिमुख सेवा-सुविधा देताना विरोधकांकडून राजकीय खेळीपोटी अटकाव केला जात आहे; पण त्याला न जुमानता कॉँग्रेस आघाडीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामे केली जातील. भुयारी गटार योजनेने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे, नगराध्यक्षा बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, ज्येष्ठ नगरसेवक भीमराव अतिग्रे, नगरसेविका रत्नप्रभा भागवत, आदींची भाषणे झाली. कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, बांधकाम सभापती महेश ठोके, पाणीपुरवठा सभापती श्रीरंग खवरे, प्रकाश मोरे, अशोकराव आरगे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी व ‘शविआ’चा बहिष्कारनगरपालिकेमध्ये राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशी दोन्ही कॉँग्रेसची सत्तारूढ आघाडी आहे, तर विरोधी पक्ष म्हणून शहर विकास आघाडी कार्यरत आहे. सत्तारूढ आघाडीमधील जांभळे गट वगळता आजच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवक-नगरसेविकांनी बहिष्कार टाकला. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रचार प्रारंभाला माजी खासदार निवेदिता माने मुंबई येथे आज जाणार हे माहीत असूनसुद्धा कॉँग्रेसने आजचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळेच या कार्यक्रमांना आपण उपस्थित राहणार नाही, अशी माहिती पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी दिली. त्याचबरोबर या दोन्ही विकासकामांसाठी स्थानिक खासदार व आमदार यांना निमंत्रण नसल्याने शहर विकास आघाडी त्याचा निषेध करीत आहे आणि या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाही, असे पक्षप्रतोद जाधव यांनी सांगितले.