शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस लढविणार महापालिका

By admin | Updated: May 14, 2015 01:13 IST

समिती नियुक्त : पतंगराव कदम अध्यक्ष, जूनमध्ये मेळावा

कोल्हापूर : आॅक्टोबर महिन्यात होणारी महानगरपालिकेची निवडणूक कॉँग्रेस पक्षातर्फे लढविण्याचा निर्णय बुधवारी मुंबईत झालेल्या कॉँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची समिती नियुक्त करण्यात आली असून, या समितीला सर्वाधिकार देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. महापालिका निवडणुकीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी करावे, असा प्रस्ताव पुढे आला. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कॉँग्रेसतर्फे ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली. या समितीत जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, नगरसेवक सत्यजित कदम यांचा समावेश आहे. या समितीने प्रभाग व आरक्षण निश्चिती झाल्यानंतर उमेदवारांची निवड तसेच प्रचाराची यंत्रणा राबवायची आहे. पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय या समितीनेच घ्यायचा आहे. निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने जूनच्या पहिल्या आठवड्यात कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार असून, मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक यंत्रणा कशा प्रकारे राबविता येईल, या अनुषंगानेही यावेळी चर्चा झाली. महाडिक अनुपस्थित बैठकीला आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार मालोजीराजे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संध्या घोटणे यांनाही बोलाविले होते; परंतु हे सर्वजण बैठकीला अनुपस्थित होते. याबाबत पी.एन. पाटील यांनी सांगितले की ,महाडिक यांना पक्षातर्फे निमंत्रण देण्यात आले होते;परंतु ते त्यांना मिळाले की नाही हे समजले नाही; परंतु ते कॉँग्रेसबरोबर असतील.विधानसभेचा आढावा कोल्हापूर उत्तरचे कॉँग्रेसचे उमेदवार नगरसेवक सत्यजित कदम यांनी निवडणुकीचा आढावा प्रदेशाध्यक्षासमोर सादर केला. उत्तर मतदार संघात कॉँग्रेसचे २५ नगरसेवक असून, केवळ तीन नगरसेवकांनी आपला प्रचार केला. अन्य कोणीही आपला प्रचार केला नाही. त्यामुळेच आपला पराभव झाला असे कदम यांनी सांगितले. त्यावेळी आता मी प्रदेशाध्यक्ष आहे, कार्यकर्त्यांना कामाला लावूया, असे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)