शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार विरोधात कॉंग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सात वर्षांची कामगिरी अपयशी ठरल्याचा आरोप करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सात वर्षांची कामगिरी अपयशी ठरल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात येथील कॉंग्रेसतर्फे रविवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. कॉंग्रेस कमिटीसमोर झालेल्या निदर्शनात पंतप्रधान मोदींच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडले. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार केंद्रातील मोदींच्या विरोधात निदर्शने आयोजित केली होती. यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढ, कोराना साथ नियंत्रणात न आणणे, देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी, शेतकरीविरोधी काळे कायदे, सरकारी कंपनी विकायला काढणे या विषयावर जोरदार घोषणा देण्यात आल्या. ‘सात वर्षांत ना केला विकास, मोदींनी केला देश भकास’ अशी घोषणाही लक्षवेधी ठरली. यावेळी ‘देश विक्रीचा मसुदा’, ‘मी अपयशी’ अशा आशयाचा फलक हातात असलेल्या मोदींच्या प्रतिमेचा पूर्णाकृती फलक लक्ष वेधून घेत होता. सहभागी सर्वच नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

निदर्शनात शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अॅड. सुरेश कुराडे, अॅड. गुलाबराव घोरपडे, शंकरराव पाटील, तौफिक मुल्लाणी, संजय पवार, संध्या घोटणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

----------

फोटो : ३००५२०२१- कोल- निदर्शने

कोल्हापुरातील कॉंग्रेस कमिटीसमोर रविवारी केंद्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीविरोधात आयोजित केलेल्या निदर्शनात सतेज पाटील, पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, चंद्रकांत जाधव आदी सहभागी झाले होते.

फोटो : नसीर अत्तार