इंधन व गॅस दरवाढविरोधात इचलकरंजीत काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST2021-03-09T04:25:49+5:302021-03-09T04:25:49+5:30

इचलकरंजी : सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल व गॅसची दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस समितीच्यावतीने छत्रपती शाहू महाराज ...

Congress cycle rally in Ichalkaranji against fuel and gas price hike | इंधन व गॅस दरवाढविरोधात इचलकरंजीत काँग्रेसची सायकल रॅली

इंधन व गॅस दरवाढविरोधात इचलकरंजीत काँग्रेसची सायकल रॅली

इचलकरंजी : सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल व गॅसची दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस समितीच्यावतीने छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून सायकल रॅली काढत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेल व गॅसच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल व गॅसचे दर वस्तू व सेवा करांतर्गत आणावेत. घरगुती गॅसचे अनुदान पूर्वीप्रमाणे चालू करावे, अशी मागणी केली आहे. ही सायकल रॅली के. एल. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी मोदी सरकार चले जाव, मोदी सरकारचा धिक्कार असो, भाजप हटाव देश बचाव, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक राहुल खंजिरे, संजय कांबळे, शशांक बावचकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फोटो ओळी

०८०३२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत इंधन दरवाढविरोधात काँग्रेसने सायकल रॅली काढली.

छाया-उत्तम पाटील

Web Title: Congress cycle rally in Ichalkaranji against fuel and gas price hike