शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

केबीनवरून विरोधकांचा सभात्याग

By admin | Updated: September 5, 2015 00:17 IST

गडहिंग्लज पालिका सभा : बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह बांधकामास मंजुरी

गडहिंग्लज : डॉक्टर कॉलनीतील मुलींच्या हायस्कूलनजीक सुमारे साडेपाच कोटींच्या बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात बांधकामास सर्वसाधारण सभेत पालिकेची मंजुरी मिळाली, तर काळ्या फिती लावून आलेल्या विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांची केबीन काढून घेतल्याच्या निषेधार्थ सभात्याग केला.नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सव्वा तासात चोवीस विषयांना मंजुरी मिळाली. उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्या केबीनच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांत सुरुवातीलाच खडाजंगी झाली. त्यांनी कामासाठी घेतलेली पालिकेची गाडी काढून घेऊन त्यांचा अवमान केल्याचा आरोप करून विरोधकांनी सभात्याग केला.सगळीकडे महिलांचा सन्मान केला जात असताना गडहिंग्लज पालिकेत सत्ताधारी व प्रशासनाकडून संगनमताने महिला उपनगराध्यक्षांचा अवमान होत आहे. उपनगराध्यक्ष या आरोग्य व पाणीपुरवठा खात्याच्या सभापती असतानाही त्यांची केबीन काढून घेतली, असा आरोप त्यांनी केला. त्यास दुजोरा देण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या हारुण सय्यद यांना नगराध्यक्षांनी रोखले. स्वीकृत नगरसेवकांनी सल्ला देऊ नये, आवश्यकता भासली तरच सल्ला घेऊ, असेही त्यांनी सुनावले. यावेळी आपल्या पूर्व परवानगीशिवाय पालिकेची गाडी वापरता येणार नाही, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट करताच विरोधकांनी हंगामा करून सभात्याग केला.केबीन आणि खुर्चीसाठी लढाई करणाऱ्या उपनगराध्यक्षांनी आपल्याकडील महत्त्वाच्या खात्याच्या किती सभा व कोणते निर्णय घेतले असा सवाल सत्ताधारी आघाडीच्या गटनेत्या प्रा. स्वाती कोरींनी विचारला. विकासकामांचे प्रस्ताव घेऊन पालकमंत्र्यांना भेटायला जाण्याकरिता म्हणून नगराध्यक्षांनी गाडी मागून घेतली, असा खुलासाही त्यांनी केला.मुश्रीफ यांच्यासारखे कर्तव्यदक्ष आमदार नेते म्हणून लाभले असतानाही एकही ठोस काम केले नाही. चर्चेला कोणताही मुद्दा नाही म्हणूनच विरोधकांनी सभात्याग केला आहे. त्यांच्या कारकिर्दीतील गाडीच्या गैरवापराची चौकशी करावी आणि खासगी कामासाठी गाडी वापरलेल्यांकडून भरपाई वसूल करावी, अशी मागणी नरेंद्र भद्रापूर यांनी केली.ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते जनार्दन पेडणेकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत वापरलेली केबीन दिली असतानाही उपनगराध्यक्षा नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. नगराध्यक्षांनी आपल्या अधिकारात त्यांच्याकडील खात्यांच्या बैठका घ्याव्यात व नागरी प्रश्न निकाली काढावेत, अशी सूचना भद्रापूर यांनी केली. कर्तव्यात कसूर केलेल्या उपनगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीत पावणे दोन लाखांचा अपहार झाला असून, पालिकेत बसविण्यात आलेल्या ‘सीसीटीव्ही’ खरेदीतही असाच प्रकार झाला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करावी, अशी मागणीही भद्रापूर यांनी केली. प्रारंभी पुरोगामी विचारवंत, माजी कुलगुरू डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे गटनेते रामदास कुराडे, किरण कदम वगळता सर्व नगरसेवक उपस्थित होते. मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. सत्ताधाऱ्यांची भूमिका दुटप्पीपणाचीविकासकामाला आमचा विरोध नाही. मात्र, गतवर्षी विरोधात असताना खुल्या बाजारातील गणवेश खरेदीस विरोध करून शासकीय महामंडळाकडून कापड खरेदीच्या आग्रहासाठी सभात्याग करणाऱ्या मंडळींनी सत्तेवर आल्यानंतर खुल्या बाजारातून गणवेश खरेदी केली आहे. त्यांच्या दुटप्पीपणाचा निषेध करतो, असा टोला उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत हाणला. हारुण सय्यद म्हणाले, उपनगराध्यक्षांच्या ‘केबीन’संदर्भात नगराध्यक्षांच्या बेकायदेशीर आदेशाची अंमलबजावणी करून प्रशासनाने पालिका अधिनियमाचा भंग केला आहे. यावेळी नगरसेविका अरुणा शिंदे, मंजूषा कदम, लक्ष्मी घुगरे, दीपा बरगे, सरिता गुरव उपस्थित होत्या.