शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे भूसंपादन ३० जूनपर्यंत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 11:38 IST

Kolhapur Ratnagiri highway : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या पहिल्या टप्यातील पैजारवाडी ते शिये फाट्यापर्यंतच्या कामासाठी भूूसंपादनाचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करावे. त्यानंतर कामाची निविदा प्रसिध्द करावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी  दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे भूसंपादन ३० जूनपर्यंत पूर्ण करा पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना

कोल्हापूर : कोल्हापूररत्नागिरीमहामार्गाच्या पहिल्या टप्यातील पैजारवाडी ते शिये फाट्यापर्यंतच्या कामासाठी भूूसंपादनाचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करावे. त्यानंतर कामाची निविदा प्रसिध्द करावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी  दिली. कोल्हापूर-रत्नागिरी मंजूर रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीत ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबा ते पैजारवाडी आणि पैजारवाडी ते शिये फाटा असा एकूण ७८ किलोमीटरच्या रस्ता मंजूर आहे. हे काम दोन टप्प्यांत होणार आहे. आंबा ते पैजारवाडी रस्त्यासाठी १६५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. ते एक महिन्यात पूर्ण करावे. पैजारवाडी ते शिये फाट्यावरील जमीन संपादनाचे काम ३ जूनपूर्वी पूर्ण करावे. याशिवाय पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगावजवळ वारंवार अपघात होत आहेत. अपघात टाळण्यासाठीच्या उपाय योजना तातडीने कराव्यात.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंधारकर म्हणाले, कोल्हापूर रत्नागिरी महामार्गातील ७८ किलोमीटरच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी २६९२ कोटींची गरज आहे. या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. या रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. हे काम गतीने होणे आवश्यक आहे. पहिल्या टप्यातील पैजारवाडी ते शिये फाट्यापर्यंतच्या रस्त्यासाठी ९० टक्के जमिनीचे भूसंपादन झाल्यानंतर निविदा प्रसिध्द करण्यात येईल.भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी हेमंत निकम म्हणाले, कोल्हापूर - रत्नागिरी मंजूर रस्त्यासाठी भूसंपादनची प्रशासकीय कार्यवाही गतीने केली जाईल. ३० जूनपर्यंत पहिल्या टप्यासाठी आवश्यक जमिनीचे संपादन केले जाईल. यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.यावेळी खासदार मंडलिक यांनी रस्त्याचे काम करताना शेतकऱ्यांच्या तक्रारी कमी येतील, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केली. बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे सर्व्हेअर आर. डी. काटकर, भूमी अभिलेखचे अधिकारी वसंत निकम आदी उपस्थित होते.

टॅग्स :highwayमहामार्गkolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरी