जारकीहोळी यांच्याविरोधातील तक्रार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:03+5:302021-03-08T04:24:03+5:30

गेल्या आठवड्यात दिनेश यांनी रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली व पीडित मुलीला नोकरीचे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा ...

Complaint against Jarkiholi withdrawn | जारकीहोळी यांच्याविरोधातील तक्रार मागे

जारकीहोळी यांच्याविरोधातील तक्रार मागे

गेल्या आठवड्यात दिनेश यांनी रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली व पीडित मुलीला नोकरीचे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत एक सीडी प्रसिद्ध केली होती. याची दखल भाजप केंद्रीय नेतृत्वाने घेतली होती. त्यामुळे रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला होता.

माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी याप्रकरणी ५ कोटींचा व्यवहार झाला असल्याचा आरोप केला. त्यामुळे माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे, असे स्पष्टीकरण दिनेश कलहळ्ळी यांनी कन्नड वृत्त वाहिन्यांशी बोलताना दिले आहे.

लोक मला फोन करून प्रश्न विचारत आहेत. मंगळुरू ते बिदरपर्यन्त अनेकांचे मला फोन येताहेत. कुमार स्वामी यांच्या आरोपानंतर माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभे केले आहेत. आता मी चौकात मोकळेपणाने फिरू शकत नाही. सगळेजण मला संशयाच्या नजरेतून पाहात आहेत म्हणून मी वकिलांचा सल्ला घेऊन तक्रार मागे घेतली आहे.

माध्यमांना मी सीडी किंवा व्हीडिओ दिला नव्हता, तर तो व्हिडिओ आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मला संपर्क केल्याने मी कब्बन पार्क पोलिसात तक्रार दिली होती, असेही दिनेश यांनी स्पष्ट केले. कुमारस्वामी यांच्या आरोपावर याप्रकरणी ५ कोटींचा व्यवहार झाला, यावर तपास होणे गरजेचे आहे, असे मत दिनेश कलहळ्ळी यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Complaint against Jarkiholi withdrawn