शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणे भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

वडणगे : पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ प्रमाणे भरपाई द्या, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या, अशी मागणी ...

वडणगे : पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ प्रमाणे भरपाई द्या, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ५ सप्टेंबरला कृष्णा-पंचगंगा नदी संगमाजवळ जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनासंदर्भात शेट्टी यांनी वडणगे, प्रयाग चिखली आंबेवाडी, निगवे, भुयेवाडी, शिये येथील परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. जलसमाधी आंदोलनाची सुरुवात १ सप्टेंबरपासून क्षेत्र प्रयाग चिखली येथून पदयात्रेने करणार असल्याची माहितीही शेट्टी यांनी दिली. यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष -जनार्दन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष- वैभव दादा कांबळे, विक्रम पाटील , जि. प. माजी सदस्य बी. एच. पाटील, सरपंच सचिन चौगले, पं. स. सदस्य इंद्रजीत पाटील, राजू पोवार उपस्थित होते.

फोटो : २५ वडणगे शेट्टी

वडणगे (ता. करवीर) येथे स्वाभिमानी संघटनेच्यावतीने नियोजित जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.