(वाणिज्य...) ‘लोकमान्य’च्या सुवर्ण अंकुर योजनेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:37+5:302021-04-04T04:23:37+5:30

कोल्हापूर : लोकमान्य सोसायटीच्या सभासदांसाठी ‘लोकमान्य सुवर्ण’ योजनेस प्रारंभ करण्यात आला आहे. ही मुदत ठेव योजना २७ महिन्यांसाठी असून ...

(Commerce ...) Launch of Lokmanya's Golden Sprout Scheme | (वाणिज्य...) ‘लोकमान्य’च्या सुवर्ण अंकुर योजनेस प्रारंभ

(वाणिज्य...) ‘लोकमान्य’च्या सुवर्ण अंकुर योजनेस प्रारंभ

कोल्हापूर : लोकमान्य सोसायटीच्या सभासदांसाठी ‘लोकमान्य सुवर्ण’ योजनेस प्रारंभ करण्यात आला आहे. ही मुदत ठेव योजना २७ महिन्यांसाठी असून गुंतवणूकदारांना आकर्षक ९.४० टक्के परतावा मिळणार आहे. ठेवीदार कमीत कमी दहा हजार किंवा एक हजाराच्या पटीत रक्कम गुंतवू शकतात. यामध्ये ठेवीदारांना तिमाही व्याज मिळणार असून ज्येष्ठ नागरिक व दहा लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना अर्धा टक्का जादा व्याज मिळणार आहे. मुदतपूर्व रक्कम काढावयाची असेल तर २ टक्के कमी व्याज दराने रक्कम मिळेल. त्याचबरोबर ठेवीवर ९० टक्के कर्ज देण्यात येणार आहे. ही योजना ३ एप्रिल ते ३० जून २०२१ पर्यंत राहणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व दिल्ली येथे २१३ शाखा कार्यान्वित आहेत. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी शाखांशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्था व्यवस्थापनाने केले आहे.

Web Title: (Commerce ...) Launch of Lokmanya's Golden Sprout Scheme