सेनापती कापशीत खड्डा काढण्याच्या कारणावरून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:46+5:302021-03-25T04:24:46+5:30

सेनापती कापशी ( ता. कागल ) येथे सामाईक परड्यात खड्डा काढण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीत दयानंद धोंडिबा बिरंबोळे हे गंभीर ...

The commander fights over the reason for digging a hole in the cotton | सेनापती कापशीत खड्डा काढण्याच्या कारणावरून मारामारी

सेनापती कापशीत खड्डा काढण्याच्या कारणावरून मारामारी

Next

सेनापती कापशी ( ता. कागल ) येथे सामाईक परड्यात खड्डा काढण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीत दयानंद धोंडिबा बिरंबोळे हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी गणेश जानबा बिरंबोळे, जानबा गणू बिरंबोळे या दोघावर मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपाली दयानंद बिरंबोळे व गणेश जानबा बिरंबोळे, जानबा गणू बिरंबोळे हे नात्याने भाऊबंद असून त्यांचा घराच्या वाटणीवरून वाद आहे. २३ मार्च रोजी रात्री १ वाजता दीपाली बिरंबोळे यांच्या सामाइक परड्यात गणेश जानबा बिरंबोळे, जानबा गणू बिरंबोळे तसेच गणेशचा सावत्र भाऊ योगेशे बिरंबोळे व गावातील राहुल भोळे, चिल्ल्या इंगळे, विजय तेलवेकर हे गणेशच्या संडासाचे बांधकाम करण्याकरिता खड्डा काढत होते.

त्यावेळी दीपाली बिरंबोळे व तिचे सासू सासरे व पती दयानंद यांनी परड्याच्या वाटण्या करून खड्डा काढा असे सांगत असताना गणेश जानबा बिरंबोळे, जानबा गणू बिरंबोळे यांनी दयानंद बिरंबोळे व सासरा-धोंडीबा यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली . तसेच गणेश बिरंबोळे याने लोखंडी पार दयानंद बिरंबोळे यांच्या डोकीत मारल्याने ते गंभीर जखमी झाले.या प्रकरणी दोघावर मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास मुरगूड पोलीस करीत आहेत .

Web Title: The commander fights over the reason for digging a hole in the cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.