चला..भवताल चांगुलपणाने पेरूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:02+5:302021-04-27T04:26:02+5:30

मृत्यूचे आणि सामाजिक बहिष्काराच्या भयावर मात करणाऱ्या घटना आणि व्यक्ती यांची मनाेगते समाेर यायला हवीत, आम्ही या प्रतिकूल काळात ...

Come on in, take a look and enjoy yourself! | चला..भवताल चांगुलपणाने पेरूया

चला..भवताल चांगुलपणाने पेरूया

मृत्यूचे आणि सामाजिक बहिष्काराच्या भयावर मात करणाऱ्या घटना आणि व्यक्ती यांची मनाेगते समाेर यायला हवीत, आम्ही या प्रतिकूल काळात पुणे विद्यापीठात रक्तदानाचे आव्हान तरुणाईस केले. एका दिवसात खूप कमी वेळेत २०० पर्यंत बाटल्या रक्तदान झाले. सांगली येथे टाळेबंदीच्या काळात २०० बाटल्या रक्तदान झाले. या रक्तदानासाठी स्त्रियांनी पुढाकार घेतला हाेता. अनेक गावांत माझ्यासाेबत काम करणारी तरुणाई हाेम क्वारंटाईन असलेल्या घरामध्ये डबा नेऊन देत आहे. दारात बसून गप्पा मारणाऱ्या प्रत्येकाने जबाबदारी उचलली आहे. सामाजिक बहिष्काराच्या भयाला कृतीने ही तरुणाई उत्तर देत आहे.

मृत्यूच्या भयाला दूर सारण्यासाठी अनेक कलाकार काेविड सेंटरमध्ये जाऊन आपल्या कलेतून भयाला दूर करण्यासाठी सरसावली आहेत. काळजीने, चिंतेने आणि परिस्थितीने त्रासले असताना भवताल चांगुलपणाने पेरणे ही एक पवित्र सेवाच आहे. या सेवेच्या त्सुनामीची आता गरज आहे. ज्याच्याजवळ जे सामर्थ्य आहे, वाणी, लेखणी, करणी कथनी ही सारी एकत्रितरीत्या वापरून या अवस्थेत ‘‘हम है ना’’चे बीद्रवाक्य मनामनांत पेरून त्याची अनुमती यावी. रक्त, प्लाझ्मा दानासाठी तरुणाईमध्ये चढाओढ सुरू आहे. चांगल्यांचा चांगुलपणा समाजाच्या मनावर ठसवण्याची हीच वेळ आहे. नाही तर जन्मापासून आम्ही ब्लेम गेमच करत आलाे आहाेत, अन्यथा सुरेश भट यांच्या कवितेनुसार ‘‘इतकेच मला जाताना सरणावर कळले हाेते..! मरणाने केली सुटका जगण्याने छळले हाेते!’’असे हाेईल. स्वत: नीट जगून अनेकांची आयुष्यं अर्थपूर्ण जगण्याकडे वळवता येण्याचा हाच काळ आहे. या काळाचे वर्णन करताना माझ्या मनात काही ओळी उमटतात...

सूत्र

अव्याहत चालणाऱ्या

अंधार उजेडाच्या या खेळाला

दीर्घकाळ फसू नकोस

परिस्थितीचे आविर्भाव पांघरूण हतबल होऊ नकोस

अंतर्गत कोलाहल पार करताना

विद्रोहशरण होऊ नकोस

फक्त

कधी काळी मुक्तीचा मार्ग शोधताना

संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही माती

कपाळावर लाव

मातीच्याच आधारानं माती जगव

नाती जगतीलच

प्रज्वलित कर स्नेहानं तुझ्या आतला दिवा

तसे दिव्यानं तेवतील दिवे

तुझ्या नजरेला सापडेल प्रेम

पाझरू दे

झरू दे भयविरहित वाणीतून

आस्था उत्स्फूर्त होईल आत्मीयतेत

तशी

मूल्यांच्या तळाशी

पराकोटीला गेलेली स्थिती

मानवतेचे झेंडे

मानव्याच्या पताका घेऊन चालू लागेल

एकात्म होऊन

वास्तविक क्रांती वेगळी नसतेच

Web Title: Come on in, take a look and enjoy yourself!