गडहिंग्लज-आजरा मार्गावर ट्रक व टेम्पोचा यांच्यात धडक, दोघेही चालक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 06:25 PM2020-10-19T18:25:12+5:302020-10-19T18:28:25+5:30

gadhingalj, accident, kolhpaurnews गडहिंग्लज-आजरा मार्गावरील गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील नंदापाचीवाडीजवळ आज (सोमवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास गॅस वाहतूक करणारा ट्रक आणि दूधाच्या टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत टेम्पो चालक सुनिल शिवाजी मगदूम (रा. निंगुडगे, ता. आजरा) व ट्रकचालक संतोष तवनाप्पा मंडेद (रा. कित्तूर, जि. बेळगाव) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

A collision between a truck and a tempo on the Gadhinglaj-Ajra route | गडहिंग्लज-आजरा मार्गावर ट्रक व टेम्पोचा यांच्यात धडक, दोघेही चालक गंभीर

 गडहिंग्लज-आजरा मार्गावरील गिजवणेनजीक गॅस ट्रक व दूधाचा टेम्पो यांच्यात झालेला भीषण अपघातात दोन्ही वाहनाचे झालेले नुकसान झाले आहे.

Next
ठळक मुद्देगडहिंग्लज-आजरा मार्गावर ट्रक व टेम्पोचा यांच्यात धडक, दोघेही चालक गंभीरचार तास वाहतूक ठप्प, दोनही वाहनांचे नुकसान

गडहिंग्लज :गडहिंग्लज-आजरा मार्गावरील गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील नंदापाचीवाडीजवळ आज (सोमवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास गॅस वाहतूक करणारा ट्रक आणि दूधाच्या टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत टेम्पो चालक सुनिल शिवाजी मगदूम (रा. निंगुडगे, ता. आजरा) व ट्रकचालक संतोष तवनाप्पा मंडेद (रा. कित्तूर, जि. बेळगाव) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे गडहिंग्लज-आजरा मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती. घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सोमवारी (१८) सकाळी किटवडे (ता. आजरा) रूटवरील गोकुळचे दूध घेवून गडहिंग्लजच्या दिशेने टेम्पो येत होता.

दरम्यान, कणगला (ता. हुक्केरी) येथून गॅस सिलेंडर भरून घेवून मालवणकडे केए-५१, सी-२६०१ हा ट्रक आजरामार्गे जात होता. दोन्ही वाहने गिजवणेनजीकच्या नंदापाचीवाडीनजीक आंबेओहोळ ओढ्याजवळ आले असता एकमेकांना चुकविण्याच्या नादात समोरासमोर जोरात धडकली. दोन्ही वाहने जोराने धडकल्याने दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. यामध्ये दोन्ही वाहनांचे चालक गंभीररित्या जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वाहने रस्तावर उलटल्याने ट्रकमधील गॅस सिलिंडर टाक्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. टेम्पोतील दूधाचे कॅनही खाली पडल्यामुळे दूधाचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व पालिकेच्या अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमी वाहनचालकांना गडहिंग्लजच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

गॅस वितरणचे कोणी तातडीने न आल्यामुळे सिलिंडर बाजूला सुरक्षितस्थळी हलविणे अडचणीचे झाले. त्यामुळे मार्गावरील दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहने थांबून होती. पोलिसांनी दक्षता म्हणून आजरा-गडहिंग्लज राजमार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. त्यानंतर गॅस टाक्या सुरक्षितपणे बाजूला करून व अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून तब्बल चार तासानंतर वाहतूक सुरळित सुरू झाली.
रात्री उशीरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद सुरू होती.

मोठा अनर्थ टळला

अपघातानंतर गॅस टाक्या लिक न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पालिकेच्या अग्निशमन पथकानेही कोणताही धोका म्हणून गॅस टाकीवर पाणी मारून सिलेंडर सुरक्षितस्थळी हलविले. तर दूधाच्या टेम्पोमधील दूधाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकला नाही.


 

Web Title: A collision between a truck and a tempo on the Gadhinglaj-Ajra route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.