शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लिपिक सुप्रिया शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश थेट घरात

By admin | Updated: October 16, 2015 00:02 IST

डीडी गहाळ प्रकरण : प्रशासनाकडून गंभीर दखल; आणखी काही रडारवर

कोल्हापूर : पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नितीश तुकाराम पाटील यांच्या वारसांना मस्कत प्रशासनाकडून पाठविलेला नुकसानभरपाईचा २३ लाख ३९ हजारांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) गहाळप्रकरणी लिपिक सुप्रिया शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी त्यांच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने पाठविण्यात आले आहेत. ही कारवाई एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता संबंधित अव्वल कारकून व तहसीलदारांवरही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.डीडी गहाळ प्रकरण जिल्हा प्रशासनाने चांगलेच गांभीर्याने घेतले आहे. गुरुवारी संबंधितांवर निलंबनाचे आदेश लागू होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याचे प्रसारमाध्यमांमधून समोर आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निलंबनाचे आदेश थेट लिपिक शिंदे यांच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने पाठविले. लिपिक शिंदे या दोन दिवसांपासून कार्यालयात आलेल्या नाहीत. तसेच सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदार सुनीता नेर्लीकरही दोन दिवस कार्यालयाकडे फिरकलेल्या नाहीत. त्यामुळे गोंधळ वाढला आहे. वास्तविक सर्वसाधारण शाखेच्या प्रमुख म्हणून त्यांच्याकडून हे आदेश यापूर्वीच संबंधितांना लागू करणे अपेक्षित होते; परंतु ते न झाल्याने व प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न उचलून धरल्याने निलंबनाचे घरच्या पत्त्यावर पाठविण्यात आले. तहसीलदारांनी ज्या-त्यावेळी हा डीडी भरला असता तर ही वेळ आली नसती, अशी चर्चाही या ठिकाणी सुरू आहे. (प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाकडून पोलिसांत नोंदकोल्हापूर : पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नितीश तुकाराम पाटील यांच्या वारसांना मस्कत प्रशासनाने पाठविलेला नुकसानभरपाईचा २३ लाख ३९ हजारांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) गहाळ झाल्याप्रकरणी गुरुवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद केली. निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी या प्रकरणात नायब तहसीलदार दगडे यांना प्राधिकृत केले आहे.नितीश यांच्या वारसांना पैसे मिळवून देण्यासाठी मस्कत दूतावासाला सोमवारी (दि. १२) पत्र पाठवून पैसे परत देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर डीडी गहाळप्रकरणी सर्वसाधारण शाखेतील लिपिक सुप्रिया शिंदे यांच्या घरच्या पत्त्यावर निलंबनाचे आदेश गुरुवारी पाठविण्यात आले आहेत.- शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारीया ‘डीडी’चा गैरवापर झाला असता तर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असता; परंतु त्याचा गैरवापर झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार त्यांना ‘डीडी’ गहाळ नोंद करण्यात आली असून, त्याप्रमाणे त्यांना याबाबतचा दाखला देण्यात आला. -अरविंद चौधरी, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे