जोतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST2021-03-04T04:44:25+5:302021-03-04T04:44:25+5:30

जोतिबा डोंगरावर सुमित मोगले यांनी ५० ते ६० लोकांना एकत्रित करून जोतिबा डोंगराची साफसफाई मोहीम पूर्ण केली. जोतिबा ...

Cleaning campaign on Jotiba hill | जोतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम

जोतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम

जोतिबा डोंगरावर सुमित मोगले यांनी ५० ते ६० लोकांना एकत्रित करून जोतिबा डोंगराची साफसफाई मोहीम पूर्ण केली.

जोतिबा डोंगरावर अनेक भाविक दर्शनासाठी येतात; परंतु या ठिकाणी अनेक भाविक येऊन कचरा व प्लास्टिक तसेच टाकून जातात व हलगर्जीपणा करतात. ‘लोकमत’मध्ये जोतिबा डोंगरावर साचलेल्या घनकचऱ्याचे फोटो प्रसिद्ध केले होते. सुमित मोगले यांनी या जागेला भेट दिली होती. त्यांनी त्या ठिकाणीचा एक व्हिडिओ तयार करून ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्यांची साथ देऊन जोतिबा डोंगर साफ करण्यास मदत करावी, असे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत तब्बल ६० जण एकत्र आले होते. देवस्थानच्या पुजाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. त्यांनी ठिकठिकाणी संदेश देणारे कॉमेडी पोस्टर्स लावले. जेणेकरून लोकांचे लक्ष जाईल आणि ते परिसर साफ ठेवतील.

फोटो कॅप्सन :

जोतिबा डोंगरावर सुमित मोगलेंच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीतून साफ-सफाई करून क्लीन कोल्हापूर मोहीम यशस्वी करणारे युवक, युवती व मुले.

०२ जोतिबा सफाई

Web Title: Cleaning campaign on Jotiba hill