HSC Exam: बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवारपासून सुरु होणार, परीक्षा केंद्रांना आवश्यक साहित्य पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:27 IST2026-01-21T18:26:29+5:302026-01-21T18:27:28+5:30

कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची लेखीपरीक्षा दि. १० फेब्रुवारी ते ...

Class 12th practical exam from Friday necessary materials sent to exam centers | HSC Exam: बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवारपासून सुरु होणार, परीक्षा केंद्रांना आवश्यक साहित्य पाठविले

संग्रहित छाया

कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची लेखीपरीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार, दि. २३ जानेवारी ते दि. ९ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाकडून प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य पाठवले आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. सुभाष चौगुले यांनी दिली. 

विज्ञान विषयातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा ३० गुणांची, तर इतर विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा २० गुणांची आहे. ज्या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा ३० गुणांची त्याचा लेखी पेपर ७० गुणांचा होईल. तर ज्या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा २० गुणांची त्या विषयांचा लेखी पेपर ८० गुणांचा असणार आहे.

फेब्रुवारीत लेखीपरीक्षेचे साहित्य

बारावीची लेखीपरीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून परीक्षेला लागणारे पेपर, पुरवण्या, दोरा यांसह अन्य साहित्य फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाठविले जाणार आहे. तसेच पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांसह भरारी पथकाची नियुक्तीही केली जाणार आहे.

Web Title : एचएससी प्रायोगिक परीक्षा शुक्रवार से शुरू; केंद्रों को सामग्री भेजी गई

Web Summary : महाराष्ट्र एचएससी की प्रायोगिक परीक्षा 23 जनवरी से शुरू। कोल्हापुर बोर्ड ने सामग्री भेजी। विज्ञान के प्रयोग 30 अंक, अन्य 20 के। लिखित परीक्षा 10 फरवरी से; सामग्री फरवरी के पहले सप्ताह में भेजी जाएगी।

Web Title : HSC Practical Exams Start Friday; Materials Sent to Centers

Web Summary : Maharashtra HSC practical exams commence January 23rd. Kolhapur board dispatches materials. Science practicals are 30 marks, others 20. Written exams begin February 10th; materials will be sent first week of February.