शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

सर्किट बेंचसाठी प्रसाद जाधव ४२ किलोमीटर धावणार

By admin | Updated: January 17, 2015 00:10 IST

मुंबईत उद्या मॅरेथॉन स्पर्धा : गेल्यावर्षीही केली होती जनजागृती

कोल्हापूर : कोल्हापूरला प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे या मागणीसाठी मुंबईतील मॅरेथॉन स्पर्धेत उतरणार असून, तब्बल ४२ किलोमीटर धावणार आहे. पुन्हा एकदा ‘जर्नी फॉर जस्टिस’चा नारा देत रविवार (दि. १८) सकाळी सहा वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथून मॅरेथॉनला सुरुवात करणार असल्याची माहिती कोल्हापुरातील पक्षकार व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.जाधव म्हणाले, गेल्या २५-३० वर्षांपासून या प्रश्नासाठी कोल्हापूरसह रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्णांतील वकील बांधव लढा देत आहेत. गतवर्षी मुंबईतील मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो होतो, त्यावेळीही याप्रश्नी जनजागृती केली होती. मात्र, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी शासन सकारात्मक नसल्याचे दिसते. मॅरेथॉनचा प्रवास बांद्रा सी लिंक, वरळी व पुन्हा सीएसटी असा सुमारे ४२ किलोमीटरचा आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, सर्किट बेंचप्रश्नी वकील बांधव आंदोलन करीत आहेत. गतवर्षी ३१ जानेवारी २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी यावर निर्णय घेतो, असे सांगितले होते; पण अद्यापही या प्रश्नावर निर्णय झालेला नाही. पत्रकार परिषदेस माजी अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी राणे, सचिव अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)