शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या गतवैभवासाठी योग्य उमेदवार निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : असुविधांमुळे बदनाम झालेल्या कोल्हापूरला गतवैभव मिळवून देण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत योग्य उमेदवारांची निवड करा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : असुविधांमुळे बदनाम झालेल्या कोल्हापूरला गतवैभव मिळवून देण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत योग्य उमेदवारांची निवड करा, असे आवाहन भारतीय जन संविधान मंचच्यावतीने करण्यात आले.

भारतीय जन संविधान मंचच्यावतीने रविवारी शाहू स्मारक भवनात ‘मी मतदार कोल्हापूर घडवणार’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हे चर्चासत्र झाले. निवडणुकीच्या तोंंडावर मतदारांना अनेक आश्वासने दिली जातात. थेट पाईपलाईन करू, मुबलक पाणी देऊ, चकचकीत रस्ते करू, परवडतील अशा आरोग्य सुविधा देऊ, शहर स्वच्छ ठेवू, ही आश्वासने दर पाच वर्षांनी मतदारांना ऐकायला मिळतात. मात्र, यातील काहीच होत नाही. आपण मात्र भूलथापांना बळी पडतो. आगामी महापालिका निवडणुकीत चांगल्या उमेदवारांच्या मागे उभे रहावे, यासाठी भारतीय जन संविधान मंच काम करेल, असे पारस ओसवाल यांनी सांगितले. यावेळी संजय पाटील, प्रसाद जाधव, विजयकुमार माने, जीवन बोडके, संदीप देसाई, गणेश लाड, सतीश मोरे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : भारतीय जन संविधान मंचच्यावतीने रविवारी शाहू स्मारक भवनात ‘मी मतदार कोल्हापूर घडवणार’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी पारस ओसवाल, जीवन बोडके, संदीप देसाई, प्रसाद जाधव, संजय पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-०७०२२०२१-कोल-भारतीय मंच) (छाया-नसीर अत्तार)