शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक सांडपाणी विनाप्रक्रिया थेट काळ्या ओढ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST

इचलकरंजी : औद्योगिक रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच बंद असल्याने ते पुन्हा विनाप्रक्रिया थेट काळ्या ओढ्यात सोडले जात ...

इचलकरंजी : औद्योगिक रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच बंद असल्याने ते पुन्हा विनाप्रक्रिया थेट काळ्या ओढ्यात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. त्यामुळे याप्रकरणी सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रकल्प (सीईटीपी) यांच्या निष्काळजीपणाची तक्रार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे यांनी दिली.

शहरातील प्रोसेसमधून कापडावर प्रक्रिया केल्यानंतर बाहेर सोडले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून ते काळ्या ओढ्यात सोडले जावे. जेणेकरून प्रदूषणाची तीव्रता कमी होण्यासह शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात सीईटीपी प्रकल्प उभारला. हा प्रकल्प शहरातील उद्योगांसाठी संजीवनी ठरला होता; परंतु गत काही वर्षांपासून या प्रकल्पाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. त्या तक्रारींच्या अनुषंगाने पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक शशांक बावचकर, राजू आलासे, बाजी कांबळे व अधिकाऱ्यांनी सीईटीपी व काळ्या ओढ्याची पाहणी केली.

त्यामध्ये सीईटीपी येथून बोहरा मार्केट परिसरातून गेलेल्या काळ्या ओढ्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी जात असल्याचे निदर्शनास आले. त्याची माहिती घेतली असता एका ठिकाणी गटारींमधून येणारे सांडपाणी, तर दुसरीकडे सीईटीपी येथून सोडलेले सांडपाणी निदर्शनास आले. सीईटीपी येथे प्रक्रिया करून पाणी सोडल्याचे सांगितले जात असले तरी ओढ्यात येणारे पाणी रसायनमिश्रित व काळसर असल्याचे दिसून आले. त्यामुळे ओढ्यात मिसळणाऱ्या पाण्याचे दोन्ही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर सर्वांनी थेट सीईटीपी येथे जाऊन पाहणी केली. तेथे औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणारी यंत्रणाच बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विनाप्रक्रिया सांडपाणी थेट ओढ्यात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे सीईटीपीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यासंदर्भात माहिती देताना पाणीपुरवठा सभापती सुर्वे यांनी, सीईटीपीमधील या निष्काळजीपणाबद्दल आपण खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार आहोत. सीईटीपी येथील व्यवस्थापनाकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. तो कदापिही सहन केला जाणार नाही. दोषींवर निश्‍चित कारवाई व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

२० आयसीएच सांडपाणी

(फोटो ओळी) इचलकरंजीतील सीईटीपी प्रकल्पातून विनाप्रक्रिया काळ्या ओढ्याला सोडले जाणाऱ्या पाण्याचे नमुने सभापती दीपक सुर्वे, संजय केंगार, नगरसेवक शशांक बावचकर, बाजी कांबळे आदींनी घेतले.