शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लॅबचालकांची यादी तपासल्यास सत्य समोर, 'सीपीआर'मधून खासगीत रूग्ण पळवणारी टोळी सक्रिय 

By भीमगोंड देसाई | Updated: December 4, 2025 12:14 IST

गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : सीपीआरमध्ये रक्ताची गरज असलेल्या विभागात दाखल झालेल्या रुग्णांची यादी आणि परिसरातील खासगी रक्त चाचणी करणाऱ्या लॅबचालकांकडे रक्त तपासणी केलेल्या रक्ताची यादी तपासली तर मोठे घबाड समोर येणार आहे.चौकशी समितीने चौकशीत याचीही सखोल चौकशी करावी आणि सीपीआरमधील गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, सीपीआरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना आपल्या खासगी दवाखान्यात नेण्याची टोळीही सक्रिय असल्याचा आरोप होत आहे.सीपीआरमध्ये काही डॉक्टर आणि खासगी रक्त तपासणी लॅबचालकांतील अर्थपूर्ण लागेबांधे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केले. केवळ उघड करून न थांबता बेकायदेशीरपणे नातेवाईकांकडून घेतलेले पैसेही परत करण्यास भाग पाडले. यामुळे सीपीआरमधील नातेवाईकांकडून होणारी पैशाची लूट चव्हाट्यावर आली आहे.याची दखल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही घेतली आहे. त्यांनी या प्रकरणातील आणि रुग्णांवर जाणीवपूर्वक उपचार करण्यात दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सीपीआर प्रशासन हडबडून जागे झाले आहे. 

बोगस दिव्यांग दाखलेही... कारवाई प्रलंबितसीपीआरमध्ये बोगस दिव्यांग दाखले दिल्याचे प्रकरणही उघड झाले आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे प्रशासनाने केली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई प्रलंबित आहे.

समिती निपक्षपातीपणे चौकशी करणार का ?खासगी रक्त तपासणी लॅबचालकांकडून सीपीआरमधील रुग्णांच्या नातेवाईकांकडून गोळा केलेले पैसे प्रकरणाच्या चौकशीसाठी सीपीआरमध्ये चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये सर्व सदस्य सीपीआरमधीलच अधिकारी, डॉक्टर आहेत. त्यांच्याकडून सीपीआरमधील दोषी डॉक्टरांना शोधून काढण्याचे काम निपक्षपातीपणे आणि निर्भयपणे होणार का ? असा प्रश्न तक्रारदार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रूपेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.

वसुलीत कारभारी डॉक्टर अधिकारी मास्टरमाईंडसीपीआरच्या वरिष्ठ अधिकारी पदावर कोणीही आले तरी त्यांच्या मागे, पुढे फिरत राहणारा आणि अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून असणारा एक डॉक्टर अधिकारी वरकमाईचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जाते. तोच वरकमाईची जोडणी लावतो आणि कमाईचा वाटाही ठरवतो, अशाही तक्रारी आहेत. त्याच्या विरोधात कोणी डॉक्टराने तक्रार केली तर त्या डॉक्टरांच्या विरोधात काही संघटनांना फूस लावून तक्रार करायलाही तो लावतो. अशाप्रकारे त्याने आपली दहशत सीपीआरमध्ये तयार केली आहे, अशी चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur CPR Hospital: Private Labs Involved in Patient Exploitation Scandal

Web Summary : Kolhapur's CPR hospital faces scrutiny over alleged exploitation by private labs. An internal nexus diverts patients for unnecessary tests, raising concerns about financial misconduct and delayed care. An inquiry is underway, questioning impartiality due to in-house members.