शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

कोल्हापूर ‘आरोग्य उपसंचालक’ मधील सेवानिवृत्त अधीक्षकाचीच दीड लाखाला फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 15:12 IST

पुणे येथील आरोग्यसेवा सहसंचालक कार्यालयात नोकरी लावतो असे सांगून दीड लाख रुपयांची फसवणूक व फोनवरुन शिवीगाळ करुन दमदाटी केल्याप्रकरणी वेगुर्ला (जि. सिंधुदूर्ग) येथील तरुणावर कोल्हापूरातील लक्ष्मीपुरी पोलिसात बुधवारी (दि. १०) गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देकोल्हापूर ‘आरोग्य उपसंचालक’ मधील सेवानिवृत्त अधीक्षकाचीच दीड लाखाला फसवणूकवेगुर्लातील तरुणावर गुन्हा दाखल : मुलाला नोकरी लावण्यासाठी दिले होते पैसे

कोल्हापूर : पुणे येथील आरोग्यसेवा सहसंचालक कार्यालयात नोकरी लावतो असे सांगून दीड लाख रुपयांची फसवणूक व फोनवरुन शिवीगाळ करुन दमदाटी केल्याप्रकरणी वेगुर्ला (जि. सिंधुदूर्ग) येथील तरुणावर कोल्हापूरातील लक्ष्मीपुरी पोलिसात बुधवारी (दि. १०) गुन्हा दाखल झाला.अभय मेघश्याम रेडकर (वय ३८, रा. आनंदी आर्केड, फेज नंबर १, बी विंग, तिसरा माळा, प्लॅट नंबर ५, बी ८, साई मंगल कार्यालयासमोर , वेगुर्ला) असे या संशयिताचे नांव आहे.याबाबतची फिर्याद कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक प्रमोद भालचंद्र वढणेरकर ( वय ६०, रा. प्लॉट नंबर ७४, वर्षानगर, कोल्हापूर ) यांनी कोल्हापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दिली. त्याप्रमाणे पोलिसांना याचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.पोलिसांनी सांगितले की, प्रमोद वढणेरकर हे आरोग्य उपसंचालक कोल्हापूर कार्यालयात अधीक्षक म्हणून कार्यरत होते. अभय रेडकर याची आई वॉर्ड आया म्हणून शिरोडा (ता. वेगुर्ला) येथे काम करीत होत्या. अभय हा आईच्या कामासाठी कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात येत होता. त्यामुळे अभय रेडकर व प्रमोद वढणेरकर यांची ओळख झाली.वढणेरकर यांनी मुलाच्या नोकरी संदर्भांत त्याच्याशी चर्चा केली. त्यावेळी अभयने पुणे येथील आरोग्य सहसंचालक कार्यालयात माझी ओळख आहे, असे सांगून वढणेरकर यांच्या मुलास ह्य पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट क्लास ३ रिक्रुटमेंटह्ण लेखी परिक्षा देण्याबाबत सांगितले. त्यांच्या मुलाने २७ आॅक्टोंबर २०१३ ला कोल्हापूर केंद्रामधून ही परिक्षा दिली.त्यानंतर पुण्यातील साहेबांशी बोलणे झाले असल्याचे अभय रेडकर याने वढणेरकर यांना सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी मुलाच्या नोकरी करीता वेगुर्ला येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत दीड लाख रुपये १७ डिसेंबर २०१४ ला अभयच्या खात्यात भरले.लेखी परिक्षा निकालानंतर वढणेरकर यांनी अभयशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो टाळाटाळ करु लागला. त्यानंतर अभयने मेन रोड रेडी (ता. वेगुर्ला) येथील याच राष्ट्रीयकृत बँकेचा दीड लाख रुपयांचा धनादेश वढणेरकर यांना २८ आॅक्टोंबर २०१५ ला दिला. त्यांनी दुसऱ्या बँकेत हा धनादेश भरला असता, तो वटला नाही.त्यामुळे त्यांनी अभयशी फोनवरुन संपर्क साधला असता, त्यांना ह्यअर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन तुमचे पैसे देत नाही, तुम्हाला काय करायचे कराह्ण अशी धमकी अभयने दिली. अखेर वढणेरकर यांनी याबाबत न्यायालयात फिर्याद दिली. त्याप्रमाणे सीआरपीसी १५६ ह्य३ह्ण प्रमाणे तपासाचे आदेश न्यायालयाने दिले. १७ डिसेंबर २०१४ ते आजअखेर फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्ग