शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेतील सव्वाचार कोटींच्या घोटाळाप्रकरणी ७० जणांवर आरोपपत्र

By admin | Updated: September 5, 2015 00:21 IST

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी गैरव्यवहाराची जबाबदारी संचालक व कार्यकारी संचालकांवर निश्चितीसाठी चौकशी सुरू केली आहे.

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चार कोटी १८ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी चौकशी अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक, ११ अधिकाऱ्यांसह १६ वारसदार अशा ७० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. येत्या २४ सप्टेंबरला यासंदर्भात सुनावणी होणार असून, सर्वांना म्हणणे सादर करण्याची नोटीस बजाविली आहे.जिल्हा बँकेचे २00१-0२ ते २0११-१२ या कालावधीतील बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला पगाराचा खर्च, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी गैरव्यवहाराची जबाबदारी संचालक व कार्यकारी संचालकांवर निश्चितीसाठी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी ४४ माजी संचालक व तीन तत्कालीन कार्यकारी संचालकांना नोटीस दिली होती. त्यानंतर मृत चार संचालकांच्या १६ वारसदारांनाही सुनावणीसाठी नोटिसा बजाविल्या. गेले चार महिने सुनावणीचे काम सुरू होते. यात संचालक, अधिकाऱ्यांनी म्हणणे सादर केले आहे. त्यानंतर कोल्हापुरे यांनी बँकेचे संचालक, अधिकारी व मृत संचालकांचे वारसदार अशा एकूण ७० जणांवर सहकार अधिनियम ७३ (३) अन्वये आरोप निश्चित केले आहेत. बँकेच्या नुकसानीला संबंधितांना जबाबदार धरून वसुली का करण्यात येऊ नये, अशी नोटीसही बजाविली आहे. त्यावर पुन्हा संचालक व अधिकाऱ्यांची २४ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)